सोलापूर जिल्हा परिषदेत भाजप समविचारी आघाडीची सत्ता आल्यानंतर अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, यांच्यात मागील चार महिन्यापासून धुसफूस होती, त्यात आनंद तानवडे, मदन दराडे, अरुण तोडकर यांची वेगळीच भूमिका होती, नाराजी इतकी वाढली की अध्यक्षच बदलाची चर्चा जिल्हा परिषदेत झाली, याच पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत परिचारक, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार समाधान आवताडे यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या नंदादीप मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीला आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, खासदार डॉ जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार प्रशांत परिचारक आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार समाधान आवताडे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख जिल्ह्याचे संघटन सचिव धैर्यशील मोहिते-पाटील जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे मदन दराडे अरुण तोडकर दामाजी कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख बिभीषण आवटे वसंतराव देशमुख, अतुल पवार के के पाटील यांची उपस्थिती होती, या बैठकिला झेडपी सीईओ सोडून इतर सर्व विभाग प्रमुखाना बोलावण्यात आले होते, बैठकीनंतर आमदार परिचारक यांनी माहिती दिली,
यापुढे आमदार प्रशांत परिचारक व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर जिल्हा परिषदेची जबाबदारी देण्यात आली, मागील काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेतील पदाधिकारी सदस्यांमध्ये समन्वय नव्हता अनेक फाईली वरून खटके उडत होते कोरोनामुळे बैठक घेता आले नाही मात्र आता आठ आमदारांनी दर सोमवारी वेळ मिळेल तसे जिल्हा परिषदेत येऊन आपापल्या सदस्यांची कामे समन्वयाने करून घ्यावी सर्व सदस्यांना समान निधी वाटप करायचा, सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी समन्वय ठेवायचा असा निर्णय या बैठकीत झाला अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे आणि अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला. सदस्य आनंद तानवडे सदस्य मदन दराडे अरुण तोडकर तसेच अतुल पवार ही चौकट सुद्धा या बैठकीनंतर आनंदी दिसून आली.




















