अनेक महिन्यांच्या गॅपनंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सोलापूरच्या दौऱ्यावर होते सांगोल्याचे माजी आमदार स्वर्गीय गणपत आबा देशमुख यांच्या निवासस्थानी सांत्वन भेटीनंतर पंढरपुरात स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले नंतर त्यांनी थेट बार्शी गाठली या ठिकाणी आमदार राजाभाऊ राऊत यांचे चिरंजीव बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत यांचा विवाह झाला होता,
त्यामुळे ती भेट राहिली होती, संपूर्ण राऊत कुटुंबीयांसह बार्शी तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले, विवाह सोहळ्या नंतर दुसरा रिसेप्शन सोहळा पार पडला, यावेळी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख आमदार प्रशांत परिचारक आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख बार्शी तालुका अध्यक्ष मदन दराडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे मोठी उपस्थिती होती. बार्शी भेटीचे हे फोटो पहा👇👇👇👇






























