Monday, March 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दुःखद ! महावितरण कर्मचाऱ्यांचा गणेश विसर्जना दरम्यान विहिरीत बुडून मृत्यू ; 4 वर्षीय मुलगा पोरका झाला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 September 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  महावितरण मध्ये तंत्रज्ञ या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा गणेश विसर्जना दरम्यान विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे.विजय भीमाशंकर पनशेट्टी वय 32 वर्ष,रा,हतुरे वस्ती,सोलापूर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.या घटनेने हतुरे वस्ती परिसरात शोककळा पसरली आहे कारण विजय पनशेट्टीला चार वर्षाचा मुलगा आहे. दोन वर्षांपूर्वी विजयच्या पत्नीने देखील आत्महत्या केली होती. आपल्या आई वडिलांसोबत विजय आपल्या चार वर्षीय मुलाचा सांभाळ करत होता. महावितमध्ये ड्युटी करत मुलाचा सांभाळ करत असल्याचे पाहून आजूबाजूचे शेजारी विजयचं कौतुक करत होते.पण आता विजय पनशेट्टी गणेश विसर्जना दरम्यान मृत झाल्याने चार वर्षीय मुलाचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न पडला आहे.

सोलापूर शहरातील हतुरे वस्ती येथे विजय पनशेट्टीने आपल्या मित्रांसोबत  विश्वविनायक हरी ओम गणेश मंडळ स्थापन केले होते.गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीचे निर्बंध असल्याने गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती.यंदा मात्र सर्व निर्बंध शिथिल झाल्याने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता.विजय पनशेट्टी हा या गणेश मंडळाचा अध्यक्ष होता.9 सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास टिकेकरवाडी येथील एका विहिरीत विजय आपल्या मंडळासोबत मिरवणूक काढत गणेश विसर्जनासाठी गेला होता.गणेश मूर्ती घेऊन विहिरीत गेला आणि मूर्तीसोबत विजय देखील बुडाला.रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यात आला पण विजय पनशेट्टी सापडला नाही.पहाटेच्या सुमारास जीवरक्षक व पोलिसांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आले.

विजय पनशेट्टी हा महावितरण मध्ये गेल्या दहा वर्षांपासून तंत्रज्ञ म्हणून नोकरीस होता.सोलापूर शहरातील गुरुनानक चौक येथील कार्यालयात त्याची नियुक्ती होती.त्याने पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह केले होते.पत्नी, एक मुलगा,दोन भाऊ,आई वडील असा परिवार होता.कौटुंबिक वादातून पत्नीने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.तेव्हापासून विजय मानसिक तणावात होता,पण चार वर्षीय मुलाने विजयचे सर्व मानसिक ताण हलके केले होते.गेल्या दोन वर्षांपासून विजय आई वडील,व मुलगा हतुरे वस्ती येथे राहत होते.ड्युटी करून मुलाचा सांभाळ करण्यात तो नेहमी व्यस्त असायचा.पण गणेश विसर्जनादरम्यान विजयचा मृत्यू झाल्याने चार वर्षीय मुलगा पोरका झाला.आता या मुलाचा सांभाळ कसा आणि कोण करणार असा प्रश्न पडला आहे.त्याचा मृतदेह घरी आल्यावर हतुरे वस्तीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.चार वर्षीय मुलाला  पाहून सर्व नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

हतुरे वस्ती परिसरातील ती विहीर शापित असल्याची माहिती नागरिक देत होते.या विहिरीत नेहमी कोणीतरी आत्महत्या करत आहेत. स्थानिक प्रशासनाने विहिर बंद करावी अशी मागणी करत आहेत.कारण ज्यावेळी विजय पनशेट्टीचा विहिरीत बुडाला तो आतील गाळमध्ये अडकला होता.त्याच्या मृतदेहासोबत गाळ,पाला पाचोळा मोठ्या प्रमाणात बाहेर आला होता.विजयच्या मृत्यूची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर जिल्हा दूध संघाच्या संचालकपदी सुरेश हसापुरे यांची निवड : हसापुरेंच्या रुपात दक्षिणला न्याय मिळाला

Next Post

संभाजी तलाव परिसर स्वच्छतेने केला टकाटक ; निर्माल्य निवारण उपक्रमाचे नागरीकाकडून कौतूक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

संभाजी तलाव परिसर स्वच्छतेने केला टकाटक ; निर्माल्य निवारण उपक्रमाचे नागरीकाकडून कौतूक

ताज्या बातम्या

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973035
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group