सोलापूर शहरातील प्रसिद्ध युवा डॉक्टर असद मुंशी यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात मोठी बातमी समोर आली असून आत्महत्येस कारणीभूत धरत मयताच्या पत्नी, मेव्हणा, सासऱ्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमद शाहनवाज मुन्शी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
डॉ मुंशी यांनी स्वतःला इंजेक्शन देऊन त्यांनी आपले जीवन यात्रा संपवली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिट्ठी लिहिल्याची माहिती समोर आली होती. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये डॉक्टर असद मूंशी यांची पत्नी फलकनाज नजीरअहमद सय्यद, सरफराज नजीरअहमद सय्यद, नजीरअहमद सय्यद, निखत सरफराज सय्यद, सर्व राहणार मोहिते नगर, शगुन अपार्टमेंट होटगी रोड सोलापूर व डॉक्टर मिलिंद सरोदे राहणार जळगाव यांचा समावेश आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, सर्वांनी संगणमत करून फिर्यादीचे भाऊ मयत डॉक्टर असद मुंशी यांना मानसिक त्रास देऊन तसेच डॉक्टर मुंशी हे त्यांच्या मुलीला पाहण्यासाठी गेले असता त्यावेळेस मुलीला पाहू न दिल्याने डॉक्टर असद मुंशी यांना मानसिक त्रास देण्यात आला. त्यामुळे ते आत्महत्येस प्रवृत्त व्हावे म्हणून त्यांना वारंवार मानसिक त्रास दिला गेला व तसेच डॉक्टर मिलिंद सरोदे यांनी देखील फिर्यादी यांचा भाऊ असद मुंशी यांना फोनवर फलकनाज हिच्यासोबत माझे प्रेम संबंध आहेत असे बोलून मानसिक खच्चीकरण केले होते म्हणून त्यांचे त्रासाला कंटाळून फिर्यादी यांचा भाऊ असद मुन्शी यांनी दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्वतःचा जीव गमविला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पेटकर हे करीत आहेत.



















