Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हा परिषदेची होती साथ.. म्हणून केली कोरोनावर मात; कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांचा हृदयस्पर्शी अनुभव

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

        14 एप्रिल 2021 आमच्या मुक्तीदात्याचा 130 वा जयंती दिन, कास्ट्राईब संघटनेच्या वतीने आणि जिल्हा परिषदेच्या वतीने अत्यंत उत्साहात  साजरा झाला. संघटनेतर्फे सर्वांन मिठाई वाटून आनंद साजरा केला मानसिक समाधान लाभले.

 दि. 15/04/2021 व 16/04/2021 रोजी कार्यालयात उपस्थित राहून काम केले. दि. 17/04/2021 रोजी जेवण कडू लागू लागले, मनात शंकेची पाल चुकचूकली आणि दि. 18/04/2021 ला सकाळी खूप ताप आला, अंग दुखू लागले. त्याआधीच घरात पत्नी सौ. सुनंदा व मुलगा योगीराज हे दोघे सर्दी तापाने आजारी होते. रविवार असल्याने दवाखाने बंद होते. खूप काळजी वाटू लागली. काय करावे या चिंतेत असताना मला कास्ट्राईब संघटनेचे कार्याध्यक्ष्  भगवान चव्हाण, विस्तार अधिकारी, आरोग्य विभाग दक्षिण सोलापूर यांची आठवण झाली व त्यांना फोन करुन परिस्थिती सांगितली, त्यांनी तात्काळ घरातील सर्वांना घेऊन केटरिंग कॉलेज संभाजी तलाव, विजापूर नाका येथील कोव्हीड सेंटर येथे जाऊन तपासणी करण्यास सांगितले. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना  चव्हाण यांनी फोन करुन सांगितले. मी सहकुटुंब  पोहोचलो तेथे माझ्या पत्नीचे, मुलांचे दोन्ही सुना व नात, नातू यांचे कोरोना टेस्ट करुन घेतली. मी स्वत: माझी पत्नी व मुलगा पॉझिटीव्ह आलो. दोन्ही सुना व नात नातू निगेटिव्ह आले.

आम्ही तिघे त्याच दिवशी कोव्हीड सेंटर मध्ये ॲडमिट झालो, उपचार सुरु झाले. तेथील डॉक्टरांनी चांगली काळजी घेतली व बाहेरुन औषधे मागविली. परंतु चार दिवसांनी मला खूप त्रास होऊ लागला म्हणून तेथील डॉक्टरांच्या सल्ल्याने दि. 23/04/2021 रोजी खासगी रुग्णालय म्हणजे मुळे हॉस्पीटल मध्ये ॲडमिट करण्यात आले. दोन-तीन दिवस तेथेही मला खूप त्रास झाला. खूप भिती वाटत होती. याच वेळी माझी पत्नी आणि मोठा मुलगा कोव्हीड सेंटरमध्ये उपचार घेत होते. आणि आम्हां सर्वांची धावपळ करुन काळजी घेणारा लहान मुलगा यशोधन देखील आमच्या संपर्कात आल्याने तो देखील कोरोना पॉझिटिव्ह निघाला. आता  कुटुंबातील आम्ही चौघेही पॉझिटिव्ह झालो. यशोधनला मार्कंडेय हॉस्पीटलमध्ये ॲडमिट केले. 

माझे मनोधैर्य खचले होते. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी  दिलिप स्वामी सर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  परमेश्वर राऊत सर , मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार सर, जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ. शितलकुमार जाधव  या अधिकाऱ्यांनी मला फोन करुन धीर दिला. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना देखील फोन करुन माझ्या प्रकृती बद्दल चौकशी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी साहेब व उपमुख्य कार्यकारी अधिकारी  परमेश्वर राऊत साहेबांनी मला व्हिडिओ कॉल करुन अत्यंत आपुलकीने विचारपुस केली. राऊत साहेबांनी रोज मला फोन करुन धीर दिला. या सर्व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या प्रेमामुळे मला उर्जा मिळाली, धीर मिळाला त्यांचे उपकार मी कधीही विसरणार नाही.

मला बेड मिळवण्यापासून ते ॲडमिट करेपर्यंत माझ्या संघटनेचे माझ्या जिवा-भावाचे सहकारी श्री चंद्रकांत होळकर, संजय कांबळे, नारायण ओतारी, भगवान चव्हाण, उमाकांत राजगुरु यांनी व माझा लहान बंधू बाबासाहेब, पुतण्या सुधाकर यांनी खूप परिश्रम घेतले. माझी काळजी घेतली हे मी कधीही विसरु शकत नाही. त्यांचा मी सदैव ऋणी आहे 

माझ्या मित्र परिवारातील विजयकुमार राऊत, अविनाश गोडसे, कल्याण श्रावस्ती, आर.पी. कांबळे, रमेश खाडे, प्रशांत चाबुकस्वार, गिरीष देशपांडे, विजय टाकळीकर, सिध्दार्थ सोनवणे, लक्ष्मण् वंजारी, नागनाथ धोत्रे, सचिन साळुंखे, आनंद जाधव, गौतम हावळे, शंकर चलवादी, विलास मसलकर, प्रदिप सगट आदीसह सर्व संघटना पदाधिकारी व जिल्हा परिषद कर्मचारी यांनी फोनवर आस्थेने चौकशी करुन लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे, राज्य महासचिव मा. नामदेवराव कांबळे, वरीष्ठ उपाध्यक्ष् मा. गणेश मडावी यांनी सुध्दा मला बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचा आभारी आहे. व्यवस्थित उपचार घेऊन, आजारातून पूर्ण बरे होऊन मी, माझी पत्नी, दोन्ही मुले सुखरुप घरी आलो.

शरीरातील कोरानाचे विषाणू डॉक्टरांनी औषध उपचाराने घालवले पण मनातील भितीचे विचार जि.प. अधिकारी, संघटना कार्यकर्ते, मित्र परिवार, हितचिंतक यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपुलकीने चौकशी करुन धीर दिल्याने घालवले. आत्मविश्वास वाढविणारे सकारात्मक विचार देणारे सोलापूर जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांचा मी सदैव ऋणांतच राहीन. सदैव असेच प्रेम राहू द्या.

अरुण (भाऊ) क्षिरसागर,

जिल्हाध्यक्ष,

कास्ट्राईब जि.प. कर्मचारी संघटना,

सोलापूर.

SendShareTweetSend
Previous Post

परवानाधारक रिक्षाचालकांना खुशखबर ; मिळणार 1500 आर्थिक मदत ; जाणून घ्या काय आहे प्रकिया

Next Post

ब्रेकींग ! ग्रामीणमध्ये शेती संबंधित दुकाने आता 7 ते 2 पर्यंत सुरू राहणार ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला आदेश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! ग्रामीणमध्ये शेती संबंधित दुकाने आता 7 ते 2 पर्यंत सुरू राहणार ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला आदेश

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002492
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group