सोलापूर : सोलापूरच्या विमानसेवेचा विषय सध्या ऐरणीवर आला आहे. संसदेत याची चर्चा होऊ लागली आहे. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी विमानसेवेचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला. होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू व्हावी म्हणून सोलापूर विकास मंचने महिनाभर आंदोलन केले. त्याला सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या वतीने बोरामणी विमानतळ सुरू करण्यासाठी व कारखान्याची चिमणी वाचविण्यासाठी प्रति आंदोलन सुरू झाले आहे. आज सोमवारी बोरामणी विमानतळासाठी सिद्धेश्वर साखर कारखाना पासून मोठा मोर्चा निघणार आहे.
याच पार्श्वभूमीवर रविवारी माजी खासदार छत्रपती संभाजी राजे हे सोलापुरात होते. एका कार्यक्रमात आपल्या भाषणात त्यांनी सोलापूरच्या विमानसेवेचा विषय उपस्थित केला. सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट आहे, शहर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळण्यासाठी, मोठे उद्योग सुरू होण्यासाठी विमानसेवा महत्वाची आहे.
मात्र सोलापूरकर काही प्रयत्न का करत नाहीत, रोज तुमच्या आमदार-खासदारांना प्रश्न विचारा का?सुरू होत नाही विमानसेवा.
बोरामणी येथे मोठे विमानतळ प्रस्तावित आहे त्याचे काय झाले? जागा संपादित झाली आहे ते पूर्ण होण्यासाठी मोर्चा काढा, मी स्वतः येईन त्या मोर्चात सहभागी व्हायला.
सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...