Monday, October 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

गणेश विसर्जन ! सोलापूर महापालिका आयुक्तांचे महत्वाचे आवाहन ; भर पावसात केली शहरात पाहणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 September 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर शहरात श्री गणेश विसर्जनासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. या निमित्ताने कृत्रिम कुंड , मूर्ती संकलन केंद्र तसेच मिरवणूक मार्गाची महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी भर पावसात पाहणी केली. 

सोलापूर शहरात शुक्रवारी श्री गणेश विसर्जन होणार आहे. अनंत चतुर्थीच्या पूर्वसंध्येला महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत विविध ठिकाणी पाहणी केली. सोलापूर शहरात श्री गणेश विसर्जन करण्यासाठी महापालिकेने विविध 12 ठिकाणी कृत्रिम कुंड आणि  84 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उपलब्ध करण्यात आले आहेत. यातील काही ठिकाणांची ही महापालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली. दत्त चौक नजीकच्या गणपती घाट व श्री सिद्धेश्वर तलाव परिसराची पाहणी केली. निर्माल्य ठेवण्यासाठीची व्यवस्था या संदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या.

श्री गणेश विसर्जन  मिरवणूक मार्गाचीही त्यांनी पाहणी केली.दरम्यान,  दत्त चौक, नवी पेठ , पत्रा तालीम यासह विविध मार्गाची त्यांनी पाहणी केली. मार्गावरील रस्ते, लाईटची व्यवस्था याचीही पाहणी करून आवश्यकता सूचना दिल्या.

नागरिकांनी आपापल्या घरीच शक्यतो पर्यावरण पूरक श्री गणेश विसर्जन करावे तसेच सार्वजनिक मंडळांनी संकलन केंद्रावर श्री गणेश मूर्ती द्याव्यात. सर्व सर्वोच्च न्यायालय आणि पर्यावरण प्राधिकरणाच्या आदेशानुसार तलावामध्ये मूर्ती विसर्जन करता येणार नाही. त्याचबरोबर तीन फुटांवरील उंचीच्या श्री गणेश मूर्ती खाणीपर्यंत मंडळांनी आणून द्याव्यात. पर्यावरण पूरक श्री गणेश विसर्जनासाठी सर्व मंडळांनी महापालिकेला सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे.

दरम्यान, तीन फुटावरील गणेशोत्सव मूर्ती असलेल्या ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वाहन वाहतूक अडचण असल्याने खाणीपर्यंत येणे शक्य नाही. त्यांच्यासाठी महापालिकेच्या वतीने तेथील मूर्ती संकलन करून तुळजापूर रोडवरील खाण येथे  आणून विसर्जन करण्याची  व्यवस्था करण्यात येईल असे महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी स्पष्ट केले आहे.

 तुळजापूर रोडवरील खाण येथे अशी आहे व्यवस्था !

तुळजापूर रोडवरील खाणीमध्ये संकलित केलेल्या मुर्त्यांचे विसर्जन करण्याकरिता महापालिकेच्या वतीने नेटकी व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणाची ही महापालिका आयुक्तांनी पाहणी केली. आवश्यकता सूचना दिल्या.  तुळजापूर रोडवरील या खाण परिसरात लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी महापालिकेचे 30 कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पथक दोन शिफ्ट मध्ये तैनात राहणार आहे. सुमारे सात अभियंतेही उपस्थित राहणार आहेत. सकाळी 9 ते 5 व सायंकाळी 5 ते रात्री 12 पर्यंत या दोन शिफ्ट मध्ये कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. 

दोन क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. आत आणि बाहेर जाण्याकरिता  दोन मार्ग ठेवले आहेत. पोलीस व महापालिका पथकासाठी मंच तयार करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याची ही व्यवस्था करण्यात आली आहे.  वाहतुकीसाठी 70 गाड्या तैनात राहणार आहेत तसेच महापालिकेचे सहाशे कर्मचारी कार्यरत राहणार आहेत त्याचबरोबर मक्तेदाराकडून एका दिवसासाठी 400 कामगार उपलब्ध करून घेण्यात येणार आहेत असेही महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी सांगितले.

या पाहणीवेळी नगर अभियंता संदीप कारंजे, उपअभियंता एस. एम. आवताडे, कनिष्ठ अभियंता अभिजीत बिराजदार, अभियंता महादेव इंगळे, किशोर पक्केवाले यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात बनावट खवा बनवणारा कारखाना ‘सील’ ; आतील चित्र पाहून आला किळस

Next Post

उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता ; सीना व भीमा नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता ; सीना व भीमा नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002649
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group