Friday, August 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

कोरोना वॉर्निंग : मंगल कार्यालय, कोचिंग क्लास, प्रवासी वाहनांवर राहणार वॉच

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 February 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर, दि. १९ : जिल्ह्यातील कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा निर्बंधाची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने लग्न समारंभ,    कोचिंग क्लासेस, खासगी प्रवासी वाहने आणि खासगी दवाखान्यावर लक्ष ठेवले जाणार आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले.

कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख यांची आढावा  बैठक नियोजन भवन येथे झाली. बैठकीला महापालिकेचे आयुक्त पि. शिवशंकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते.

श्री. स्वामी यांनी सांगितले की, राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यातील कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध घालण्याची सूचना केली होती. त्यानुसार गर्दी होणाऱ्या ठिकाणी मंगल कार्यालय, कोचिंग क्लासेस,  प्रवासी वाहने, खासगी दवाखाने यांच्यावर कडक लक्ष ठेवले जाणार आहे. मंगल कार्यालयात पन्नासहून अधिक ल़ोक आढळल्यास दहा हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. दुसऱ्यांदा  पन्नासहून अधिक लोक आढळल्यास मंगल कार्यालय एक महिन्यासाठी सील केले जाईल. कोचिंग क्लासेस आणि शाळा येथे फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशनचा वापर केला जात असल्याची आरोग्य विभागाने तपासणी करावी. परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे. 

आयुक्त श्री. शिवशंकर यांनी शहरातील अनेक खासगी डॉक्टर सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असणाऱ्या पेशंटची तपासणी करुन औषधे देतात पण त्यांची कोरोना चाचणी केली जात नाही. असे करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई केली जाणार आहे. शहरातील मंगल कार्यालयात तपासणी केली जाणार आहे. हॉटेलमध्येही क्षमतेपेक्षा जास्त लोक आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नव्या सूचनांनुसार एक रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील वीस जणांची चाचणी घेतली जाणार आहे. गरज भासल्यास कंटेनमेंट झोन केले जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून कोविड केअर सेंटरची पुन्हा एकदा तयारी केली जात आहे, कोणत्या प्रकारच्या औषधांचा खप वाढत आहे आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणाऱ्या दुकानांवर कारवाई केली जाणार असल्याचे श्री. वाघमारे यांनी सांगितले. 

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, मुख्य वित्त आणि लेखाधिकारी अजय पवार, उपायुक्त धनराज पांडे, लसीकरण प्रमुख डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. इरफान सय्यद, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे राजू राठी आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हा निरीक्षक पदी झाली यांची निवड …

Next Post

सोलापूर ! MIM गटनेता खरादी नॉट रिचेबल ; कोण जाणार स्थायी समितीत ? पैलवान-शाब्दीच्या भूमिकेकडे लक्ष

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर ! MIM गटनेता खरादी नॉट रिचेबल ; कोण जाणार स्थायी समितीत ? पैलवान-शाब्दीच्या भूमिकेकडे लक्ष

ताज्या बातम्या

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995845
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group