Tuesday, May 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“ऐ बिड्डा…! ये मेरा अड्डा…!” सोलापूर झेडपीच्या प्राथमिक शिक्षण विभागातील ‘पुष्पा’ म्हणतात……

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 February 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी एका ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्याने पत्रकारांसमोर केली . ते तसे का म्हणाले याची माहिती घेतली असता बऱ्याच गोष्टी समोर आल्या.

शिक्षण विभागात असा कोणता टेबल नाही जिथं आर्थिक व्यवहार न होता कामे होत नाहीत. काही महाठग तर अशी आहेत अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर जाऊन पैसे देऊन फाईलवर सही आणतात म्हणे. सध्या प्राथमिक  शिक्षण विभागात एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे या विभागातील राजीव गाडेकर, संजय कांबळे,तजमुल मुतवल्ली या तिघा कर्मचाऱ्यांची. हे तिघेच सध्या प्राथमिक शिक्षण विभाग चालवतात असं काहीसं चित्र आहे.

वर्षानुवर्ष हे सर्व एकाच विभागात आणि एकाच टेबलावर कसे काय? हासुद्धा संशोधनाचा विषय आहे.  राजीव गाडेकर यांना तर अनेक वर्षापासून शिक्षण विभागातील टेबल सुटत नाही. गाडेकर यांनी एकाच टेबलावर तळ ठोकून बरीच माया मिळवली असल्याची चर्चा जिल्हा परिषद मध्ये आहे.  तजमुल मूतवल्ली हे कार्यालयीन अधिक्षक आहे की, जिल्हा परिषदेमधील कारकून? हेच कुणाला समजत नाही.

आपल्या टेबलावर कमी आणि हातात कागद घेऊन इकडे तिकडे जास्त फिरत असल्याचं चित्र जिल्हा परिषदेत पाहायला मिळतं. या पूर्वीचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांचं बरंच देणंघेणं ही सर्व कामे मुतवल्ली रावसाहेब पहात होते असे ऐकण्यास मिळते. त्या सर्वांमध्ये संजय कांबळे हे तर जिल्हा परिषदेमध्ये प्रसिद्ध आणि वादग्रस्त असलेलं व्यक्तिमत्व.

कुठल्या अधिकाऱ्याला कसे पैसे पैसे मिळवून द्यायचे, आपला खिसा कसा भरायचा यामध्ये कांबळे माहीर आहेत. मागील काही दिवसांपूर्वी कांबळे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामध्ये सरळ सरळ ते पैसे मागत असल्याचे ऐकण्यास मिळते. नुकत्याच झालेल्या आंतरजिल्हा शिक्षक  समायोजनमध्ये कांबळे यांनी स्वतःसह अधिकाऱ्यांनाही बक्कळ माल कमवून दिल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेमध्ये रंगली आहे.

राजीव गाडेकर, तजमुल मुतवल्ली, संजय कांबळे यांच्यासह आणखी तिघे असे सात जण दर सहा महिन्याला ट्रीपला जातात. ही ट्रीप साधीसुधी नसते, थेट विमानाने असते. या यापूर्वीची ट्रीप बेंगलोर, उटी, कडप्पा, म्हैसूर अशी झाली होती त्यानंतर आता थेट हिमाचल प्रदेशात मनाली. तीसुद्धा विमानाने… एवढा पैसा या कर्मचाऱ्यांकडे येतो कुठून असा प्रश्‍न जिल्हा परिषदेतील प्रत्येक कर्मचारी, सदस्य पदाधिकाऱ्यांना पडला आहे. संजय कांबळे यांच्या त्या व्हायरल क्लिप बाबत पुढे काय झाले, तो अधिकारी-कर्मचाऱ्यांना कसा मॅनेज करतो, नेमकी ती क्लिप काय होती पहा पुढील भागात.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : सुपर पेट्रोल पंपावर ‘राडा’ ; पेट्रोल भरताना युवकाला बेदम मारहाण ; मारेकरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Next Post

ब्रेकींग : राज्यपाल राहिले बाजूला शिवसैनिक व पोलिसात ‘वाद’ ; पोलिसांनी आसूड मारू न दिल्याने व आणलेले बॅनर जप्त करत असताना बरडे व उदय पाटील यांच्यातशाब्दीक बाचाबाची

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : राज्यपाल राहिले बाजूला शिवसैनिक व पोलिसात 'वाद' ; पोलिसांनी आसूड मारू न दिल्याने व आणलेले बॅनर जप्त करत असताना बरडे व उदय पाटील यांच्यातशाब्दीक बाचाबाची

ताज्या बातम्या

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979860
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group