सोलापूर : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने गुरुवारी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर झेंडा या उपक्रमाच्या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंग गव्हारे, मोटार वाहन निरीक्षक प्रदीप बनसोडे, किरण खंदारे, किरण गोंधळे, राहुल खंदारे, सिद्धाराम पांढरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान हर घर तिरंगा या उपक्रमाची नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर व आरटीओ गायकवाड यांनी सांगितले…
ही रॅली आरटीओ कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सात रस्ता, मोदी चौकी, रेल्वे स्टेशन, रामलाल चौक, पार्क चौक, डफरीन चौक, रंगभवन चौक मार्गे सात रस्ता ते पुढे आरटीओ कार्यालय या ठिकाणी विसर्जित होणार आहे.


















