Saturday, August 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांच्या बेजबाबदारपणाचे चौकार-षटकार? हे पुत्रप्रेम की कुणाकडून अभय?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 March 2021
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूरातील डॉ वैंशपायन मेडिकल कॉलेज व सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर सध्या चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे, ते कायम वादग्रस्त राहिले असून आता तर त्यांच्यावर वेगवेगळे गंभीर आरोप होऊ लागले आहेत, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्या बेजबाबदार पणाचे अनेक पुरावे समोर आले आहेत, वृत्तपत्रातून तशा बातम्या छापून आल्या आहेत. कोविड काळात सिव्हिल हॉस्पिटल वर सर्वाधिक भर होता अशावेळी सिव्हिल मध्ये जागा कमी पडू लागली त्यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर औदुंबर म्हस्के यांनी सिव्हिलची सद्यस्थिती सोशल मीडियावर आणली याच वेळी आपले पितळ उघडे पडते म्हणून अधिष्ठाता ठाकूर यांनी मस्के यांच्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली मात्र सर्व मीडिया मस्केच्या बाजुनी एकवटली, यामध्ये डॉक्टर ठाकूर तोंडघशी पडले .एकीकडे संपूर्ण शहर  आणि जिल्ह्याचे प्रशासन कोरोनाशी लढा देत असतानाच दुसरीकडे डॉक्टर संजीव ठाकूर सुट्टी टाकून निघून गेले हा हलगर्जीपणाचा कळस होता अशी त्या वेळी चर्चा झाली मीडियातून जोरदार टीका झाल्यानंतर तब्बल दीड ते दोन महिन्यांनी ठाकूर कामावर रुजू झाले आता ठाकूर यांच्याकडून सिव्हिल मधील मागासवर्गीय अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे उदाहरण मागासवर्गीय संघटनांनी निवेदन दिल्यानंतर  समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी एका दैनिकांमध्ये डॉक्टर संजीव ठाकूर यांची पोलखोल करणारी मालिका छापून आली,  त्याचा राग  ठाकूर यांनी डॉक्टर औदुंबर मस्के यांच्यावर काढला मस्के यांनीच ही माहिती दिल्याचे संशय व्यक्त करून त्यांना जाणीवपूर्वक त्रास देत यामध्ये डॉक्टर औदुंबर मस्के यांचे वैद्यकीय अधीक्षक पद काढण्यात आले त्यांना सफाई अधीक्षकांची खालची पोस्ट देण्यात आली एवढ्यावरच न थांबता ठाकूर यांनी त्यांना सध्या कामावरून कमी केल्याची माहिती आहे , 

सोमवारी संभाजी आरमार संघटनेने  निवेदन दिले  त्यामध्ये  अधिष्ठाता डॉ ठाकूर यांचा मुलगा डॉक्टर अमेय ठाकूर हा गोर-गरीब रुग्णांवर  बेकायदेशीरपढे शस्त्रक्रियेचे प्रयोग करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे  तो अनेकांच्या जीवाशी खेळ खेळतो अधिष्ठाता यांचा मुलगा असल्याने त्याला भीतीने कोणी बोलत नाही,  त्याची सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दंडेलशाही चालत असल्याचा आरोप संभाजी आरमारने केला आहे. बेकायदेशीरपणे तसेच  बळजबरीने शस्त्रक्रिया करत असल्याचा  व्हिडिओ काही जणांच्या हाती लागला असून तो  येत्या काही दिवसात व्हायरल होणार असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे . सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यांमध्ये कोरूना चे रुग्ण वाढत चालले आहेत दिवसाला सरासरी 80 रुग्ण वाढत आहेत सिव्हिल हॉस्पिटल मध्ये सध्या सुमारे 75 ते 80 रुग्ण उपचार घेत आहेत ए ब्लॉक मध्ये या रुग्णांवर उपचार सुरू असून कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता या ठिकाणी पाहायला मिळते ऑगस्ट 2020 मध्ये सुमारे 58 कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती झाली होती त्यामध्ये मामा, नर्स, एक्स-रे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशीयन यांचा समावेश होता मात्र त्यांना डिसेंबर महिन्यात कमी करण्यात आले नोव्हेंबर आणि डिसेंबरचा त्यांचा अद्यापही पगार दिला गेला नाही ते कर्मचारी कामावर घेण्यासाठी रोज अधिष्ठाता कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय,  जिल्हा परिषद या ठिकाणी फेऱ्या मारतात ना त्यांचा पगार दिला जातोय ना त्यांना कामावर घेतले जाते कोरोना रूग्णांसाठी नव्याने बी ब्लॉकचा एक मजला सुमारे शंभर बेडचा तयार करण्यात आला होता मात्र तो सुद्धा आता बंद करण्यात आल्याची माहिती आहे. ए ब्लॉकमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने बरा झालेला रुग्ण बी ब्लॉकमध्ये हलवला जातो मात्र त्यांना घेऊन जाण्यासाठी कर्मचारी नसल्याने त्यांच्या नातेवाईकांना स्ट्रेचर ढकलत घेऊन जावे लागत असल्याची परिस्थिती सध्या सिव्हीलमध्ये आहे, एकीकडे पालकमंत्री सर्व कोविड हॉस्पिटल कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा सूचना देतात दुसरीकडे मात्र तब्बल पाच महिने कोवीड हॉस्पिटलमध्ये काम केलेल्या कर्मचाऱ्यांना कमी केले जाते त्यांची काम करण्याची इच्छा असूनही त्यांना कामावर घेतलं जात नाही या प्रकरणात अधिष्ठाता संजीव ठाकूर यांची जबाबदारी असतानाही ते आपली ही जबाबदारी झटकत असल्याचे चित्र आहे. आपल्या पुत्र प्रेमापोटी ते अजून काय काय करणार आहेत असा प्रश्न सोलापूरकरांना पडला असून त्यांना नेमके अभय कुणाकडून मिळत आहे याचीही चर्चा आता होऊ लागली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

Covid Update ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोरोनाची पहिली लस

Next Post

प्रदेश काँग्रेसने बोलावलेली सोलापूरची बैठक पुढे ढकलली ;

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

प्रदेश काँग्रेसने बोलावलेली सोलापूरची बैठक पुढे ढकलली ;

ताज्या बातम्या

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995885
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group