प्रार्थना फाऊंडेशनच्या माध्यमातून मोरवंची येथे वंचित, निराधार, भिक्षा मागणाऱ्या, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी निवासी प्रकल्प चालवला जातो, तसेच अनाथ, निराश्रित, बेघर वयोवृध्द आजीआजोबांना आधार मिळावा या साठी वृद्धाश्रम चालवले जाते. आश्रमातील मुलांनी व आजीआजोबांनी एकमेकांना राख्या बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करून एकमेकांना गोडधोड खाऊ घातले.
आश्रमातील मुले व आजीआजोबा आम्ही सर्व एक परिवार म्हणून राहतो.आपण सर्वजण मिळून एकमेकांची काळजी घेऊ एकमेकांची रक्षा करू असा विश्वास व्यक्त करत प्रत्येकाने एकमेकांना राख्या बांधून आनंद व्यक्त केला, या वेळे सर्व मुले व आजीआजोबांनी आनंद व्यक्त केला असे मत संस्थेच्या सचिव अनु मोहिते यांनी व्यक्त केले.