सोलापूर : नियोजित महेशगौरी पोलीस गृहनिर्माण संस्था, ही सोसायटी ३४ एकर जागेवर पसरलेली आहे. त्यात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी अशा एकूण ३५० सभासद संख्या आहे. सेवेत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सेवेच्या चौकटीबाहेरच विश्व पाहता येत नाही. अशातही पोलीसांचं हक्काचं घर साकारण्यासाठी तत्कालिन पोलीस आयुक्त महेशगौरी यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे गौरवोद्गार माजी मंत्री तथा सोलापूर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी काढले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील केगांव येथील तुळशीदास जाधव सहकारी गृहनिर्माण संस्था, मर्यादित नियोजित महेशगौरी पोलीस गृहनिर्माण संस्थेच्या नामफलकाचे उद्घाटन सोमवारी, ०२ ऑक्टोबर रोजी आमदार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी आमदार देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांनी आणलेली शोभीवंत फुलांची व सावलीची झाडांचे मुख्य रस्त्याच्या व अंतर्गत रस्त्यांच्यामध्ये रोपण करण्यात आले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून वृक्षारोपण केल्याने आनंदमय भविष्यासाठी चांगली बाब असल्याचेही आमदार देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. प्रारंभी इंजिनिअर भगवान जाधव, अशोक दिलपाक, मधुकर जाधव यांनी सदर सोसायटीबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत कांबळे, पोलीस निरिक्षक श्रीमती संगीता हत्ती, मीरा पाटील, रवि हारकुड, पांडुरंग जाधव, विजय पगारे, नवाज गवंडी, दिगंबर जाधव, अमोल पाटील, गंगाधर जोगधनकर, सूत्रसंचालन श्रीमती मिनाक्षी पेठे यांनी केले. याप्रसंगी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.