सोलापूर – “शाळाबाहय अशैक्षणिक कामे बंद करा व “आम्हाला फक्त शिकवु दया” ची आर्त मागणी करिता महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या आदेशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमवार दि. 2 ऑक्टोंबर 2023 रोजी राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे. या जिल्हयात काढण्यात येणाऱ्या मोर्चेच्या नियोजनाकरिता बोलावण्यात आलेल्या सोलापूर जिल्हा प्रा. शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत बोलतांना शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी मोर्चा पगार व भत्यासाठी नाही तर आम्हाला फक्त शिकवु द्या म्हणून असल्याचे प्रतिपादन केले.
आज सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ कार्यकारी मंडळाची सभा राज्याचे कार्यकारी अध्यक्ष म. ज. मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत बाळकृष्ण तांबारे हे जिल्हा निरीक्षक म्हणून उपस्थित होते.
यावेळी सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष तात्यासाहेब यादव, महादेव जठार, धाराशीवचे जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, राज्य उपाध्यक्ष संजय चेळेकर, सरचिटणीस सुर्यकांत हत्तूरे ( डोगे ), राज्य कार्यकारी अध्यक्ष मोरे यांची भाषणे झाली.
या आहेत प्रमुख मागण्या
1. शाळाबाह्य अशैक्षणिक कामे बंद करा व आम्हाला फक्त मुलाना शिकवू दया.
2. जुनी पेन्शन लागू करण्यात यावी.
3. शाळा बचावासाठी सरकारी शाळा कार्पोरेट कंपन्याना न देणे.
4. शिक्षणाचे खाजगीकरण थांबवावी.
5. लोकप्रतनिधींकडून अवमानकारक वक्तव्ये थांबवण्यात यावी.
6. मुख्यालय राहणे अट रद्द व्हावी.
7. संच मान्यता त्रुटी दूर करण्यात यावी.
8. बदली प्रक्रिया त्रुटी दूर करावी.
9. नवीन शिक्षक भरती पूर्वी जिल्हा अंतर्गत व आंतर जिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात यावी.
10. नवीन शिक्षक भरती करण्यात यावी.
11. MS-CIT अट शिथिल करण्यात यावी.
12. शिक्षकांना १०-२०-३0 आश्वासित प्रगती योजना लागु करावी.
13. सर्व थकित बिलासाठी त्वरीत अनुदान मिळावे.
या सभेत राज्य उपाध्यक्ष विजय तडकलकर, नेते बाबासाहेब पाटील, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रणजीत थिटे, कोषाध्यक्ष महादेव जठार, उपाध्यक्ष ईरण्णा मैंदर्गी, संजय इरवाडकर, पंडीत साबा, दत्ता एडगे, संभाजी तानगावडे, संजय काशीद, रमेश शिंदे, जैनजांगडे, परमेश्र्वर किणगी, मोहन अवताडे, शंकरनळे, राजकुमार कोरे, तुकाराम जावीर, श्रीकांत जाधव, श्रीधर साखरे, सुचेंद्र बनसोडे सह जिल्हा तालुक्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.