सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता समारोह म्हणून ‘मेरी माटी मेरा देश ” अर्थात ” माझी माती माझा देश’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या कॅम्प शाळा लष्कर येथे सकाळी १० वाजता शिलाफलकमचे उद्घाटन महापालिका आयुक्त शितल तेली उगले, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त विद्या पोळ, सहाय्यक आयुक्त यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यानंतर विद्यार्थ्यांना पंचप्रण शपथ देण्यात आली. यावेळी अतिशय देशभक्तीपर वातावरणात विद्यार्थ्यांनी पंचप्रण शपथ घेतली…
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने माझी माती माझा देश या उपक्रमाचा अतिशय उत्कृष्टपणे नियोजन केले होते. या उपक्रमाला कॅम्प प्रशालेच्या मैदानावर अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला त्याबद्दल महापालिका आयुक्त तेली उगले यांनी सर्वांचे आभारही व्यक्त केले.