अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून साकार झालेले गुरुनानक चौक येथील 100 खाटांचे सामान्य रुग्णालय व 100 खाटांचे महिला, शिशु रुग्णालय सरकारच्या निष्काळजीपणामुळे सध्या बंद अवस्थेत आहेत. केवळ 5 कोटीच्या फर्निचर कामासाठी सरकारकडे पैसा नाही. यासाठी सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे व सोलापूर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिमेस गाजरचा हार घालून विविध घोषणाबाजी देत रुग्णालय गेटसमोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी युवकाध्यक्ष गणेश डोंगरे म्हणाले, आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून सन 2013 ला मंजूर करण्यात आले. गेला वर्षभरापासून या दोन्ही रुग्णालयांच्या इमारती बांधून तयार आहेत. परंतु सरकारच्या आडमुठे धोरणामुळे केवळ रुग्णालयात फर्निचरच्या कामाचे कारण देऊन बंद अवस्थेत ठेवले आहेत. सरकारने व आरोग्यमंत्र्यांनी तसेच पालकमंत्री यांनी रुग्णालये तत्काळ चालू करावे. अन्यथा आरोग्यमंत्री, पालकमंत्री यांना सोलापूर शहरात पाय ठेवू देणार नाही.
यावेळी माजी नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेर कुरेशी, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, प्रदेश युवक सचिव श्रीकांत वाडेकर, मध्य विधानसभा अध्यक्ष वाहिद बिजापूरे, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, ब्लॉक अध्यक्ष बाबुराव म्हेत्रे, तिरुपती परकीपंडला, विवेक कन्ना, सुनील सारंगी, प्रवीण वाले, शरद गुमटे, विवेक इंगळे, रवी आंबेवाले, शंकर अंजनाळकर, हनुमंत सायबोळ्ळु, धीरज खंदारे, समीर काझी, नासिर बंगाली, आदित्य म्हमाणे, मनोहर चकोलेकर, इरफान शेख, महेंद्र शिंदे, शाहू सलगर, यासीन शेख, सरफराज शेख, नासिर शेख, गणेश म्हेत्रे, सायमन गट्टू, सत्यनारायण संगा, जीवक इंगळे, विकी नाईकवाडी, चेतन जंगम, श्याम केंगार, रवी व्हटकर, दीपक खांडेकर, पवन इंगळे, शोभा बोंबे, संध्या काळे, मुमताज शेख, सलीमा शेख, मीरा घटकांबळे, भाग्यश्री कदम, लता सोनकांबळे, लता गुंडला, राधा मोरखडे, राणी कांबळे, अंजली विटकर, रुकीया बिराजदार, ज्योती मालतुमकर, नागश्री कांबळे, दिनेश डोंगरे, चंद्रकांत नाईक व इतर काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.