भारतीय जनता पार्टीला आपल्या बालेकिल्यातच खिंडार पडणार असून शहर उत्तर मधून शेकडो कार्यकर्ते करणार राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची विश्वनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टीतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून अनेक कार्यकर्ते हे पक्षश्रेष्ठी वर नाराज असून नव्याने झालेल्या कार्यकारिणीत नरेंद्र काळे यांच्या रूपाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांला संधी मिळाली त्यामुळे गटातटाला आळा बसेल व खऱ्या निष्ठवंतांना संधी मिळेल असे वाटत होते पण तसं काहीच होताना दिसले नाही.
भाजप पक्षावर निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांची मागे हुजरेगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच कार्यकारिणीत संधी मिळाल्याची चर्चा ऐकण्यास मिळते. या अगोदर देखील माजी शहर अध्यक्ष प्रा.अशोक निंबर्गी, सरचिटणीस बिज्जू प्रधाने, नगरसेवक नागेश वल्याळ असे अनेक दिग्गज पार्टी सोडून गेले तरी पक्षाने त्यातून काही बोध घेतले नाही.
त्यामुळे नाराज होऊन अनेक युवक कार्यकर्ते हे ७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती शेकडो युवा कार्यकर्ते हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे अशी विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळाली आहे..ऐन लोकसभेच्या तोंडावर या गटबाजीचा फटका भारतीय जनता पक्षाला बसेल असे कार्यकर्त्यांतुन बोले जात आहे.