सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे झेंडा वंदन कार्यक्रम संपन्न झाला. तसेच कामगार दिनानिमित्त काँग्रेस भवन येथील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच यावेळी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक विभागाच्या उपाध्यक्षपदी शौकत पठाण, हसीब नदाफ, जैन समाजाच्या अध्यक्षपदी सागर शहा, तर रमेश फुले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.
चेतन नरोटे म्हणाले, आज राज्यभर धार्मिक सलोखा बिघडविण्यासाठी अनेक शक्ती प्रयत्न करत आहेत. अस्मानी सुलतानी संकटांना न डगमगता खंबीरपणे सामोरे जाणं हा महाराष्ट्राचा इतिहास आहे तेच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत.
कर्नाटक मधील आपल्या नातलग आणि मित्रमंडळी यांना काँग्रेसच्या उमेदवारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करून मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करावे अशी विनंती चेतन नरोटे यांनी केली.
यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार, विश्वनाथ चाकोते, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, महाराष्ट्र सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, प्रदेश चिटणीस नरसिंह आसादे, मा नगरसेवक बाबा मिस्त्री, आरिफ शेख, सुशिलाताई आबूटे, अलकाताई राठोड, विनोद भोसले, तौफीक हत्तूरे, NK क्षीरसागर, हारून शेख, मा. नगरसेविका परवीन इनामदार, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, बाबूराव म्हेत्रे, लक्ष्मीकांत साका, अंबादास गुत्तिकोंडा, नागनाथ कदम, विश्वनाथ साबळे, रामसिंग अंबेवाले, अँड केशव इंगळे, बसवराज म्हेत्रे, सुशील बंदपट्टे, शकील मौलवी, हसीब नदाफ, शौकत पठाण, अनिल मस्के, तिरुपती परकीपंडला, गणेश सालुंखे, राहुल वर्धा, नूर अहमद नालवार, नासिर खान, रमेश फुले, VD गायकवाड, लखन गायकवाड, नागेश बोमड्याल, वसिष्ठ सोनकांबळे, सुमन जाधव, प्रमिला तुपलवंडे, मुमताज तांबोळी, शोभा बोबे, चक्रपाणी गज्जम, सायमन गट्टू, राजेश झंपले, सागर शहा, पृथ्वीराज नरोटे, अप्पा सलगर, सुभाष वाघमारे, चंद्रकांत टिकके, शाहु सलगर, सुनील सारंगी, नागनाथ शावने, विकास येळेगावकर, श्रीशैल रनखांबे, नागेश शहापूरे, सौरभ सालुंखे, श्रीकांत दासरी, गणेश वड्डेपल्ली, संकेत माने, अभिलाष अच्युगटला, मेहमूद शेख, मुमताज शेख, चंद्रकला निजमल्लू, चंदा काळे, बसंती सालुंखे, रेखा बिनेकर, सुनीता बेरा, रुकैयाबानू बिराजदार, मिना गायकवाड, जकिया पठाण, अनिता भालेराव, गुलाम शेख, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.






















