सोलापुर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त महात्मा गांधी यांच्या रेल्वे स्टेशन येथील पुतळ्यास आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच कॉंग्रेस भवन सोलापूर येथे भारताचे माजी पंतप्रधान स्वातंत्रसेनानी लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच यावेळी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाच्या (शरद पवार गट ) वतीने एकत्र येऊन रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी पुतळा येथे झेंडा वंदन करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, महात्मा गांधीजीनी सत्याग्रह आणि विविध प्रकारे क्रांतिकारी आंदोलने करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज देश कठीण प्रसंगातुन जात असताना या देशाला पुन्हा एकदा गांधी विचारांची देशाला गरज आहे. पंतप्रधान शोसाठी महात्मा गांधीजींचा वापर करतात इतर वेळेस मात्र त्यांच्या विचारांचा त्यांना विसर पडतो. या देशात महात्मा गांधीजींचे विचार कोणीही संपवू शकत नाही. महात्मा गांधीजीनी ज्या पक्षाला साथ दिली त्या पक्षाचे आपण आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. येणारे दिवस आपल्यासाठी आव्हानाचे आहेत. लोकांची सेवा ही सर्वोकृष्ठ सेवा आहे. लोकांची सेवा करण्याचा आणि लोकशाही आणि संविधान मजबूत करण्यासाठी आपण दृढ़ संकल्प आज करू या असे आवाहन केले.
यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी महापौर संजय हेमगड्डी, सुशीला आबुटे, प्रदेश सचिव प्रा. नरसिंह आसादे, सेवादल यगं ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते, माजी नगरसेवक विनोद भोसले, अंबादास करगुळे, सोलापूर शहर उत्तर समन्वयक सुनील रसाळे, महिला अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे, अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, प्रवक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, सेवादल यंग ब्रिगेड युवक अध्यक्ष विवेक कन्ना, कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू, प्रवक्ते वशिष्ठ सोनकांबळे, उपाध्यक्ष विश्वनाथ साबळे, बसवराज म्हेत्रे, अंबादास गुत्तीकोंडा, डॉ. आप्पासाहेब बगले, चक्रपाणी गज्जम, मधुकर आठवले, हारुण शेख, भोजराज पवार, उपेंद्र ठाकर, तिरुपती परकीपंडला, सिद्धाराम चाकोते, रफिक चकोले, केशव इंगळे, आझम सैफन, प्रवीण वाले, विजय शाबादी, ए. डी. चिनिवार, हेमा चिंचोळकर, सुमन जाधव, विणा देवकते, बिट्टू कुरेशी, शोभा बोबे, मुमताज मदर शेख, शुभांगी लिंगराज, मुमताज तांबोळी, रेखा बिनेकर, हाजीमलांग नदाफ, हनमंतु सायबोलू, नूरअहमद नालवार, रुस्तम कंपली, विकास येळेगावकर, नासिर खान, लखन गायकवाड, राजेश झंपले, शशिकांत जाधव, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, मेघश्याम गौडा, अप्पा सलगर, सुशीलकुमार म्हेत्रे, वैभव पाटील, लतीफ शेख, धीरज खंदारे, नागनाथ शावणे, श्रीकांत दासरी, शोएब कडेचुर, सलीमा शेख, लता सोनकांबळे, मुमताज शेख, रुकीयाबानु बिराजदार, अफ़रोझ तांबोळी, चंद्रकला निजमल्लू, श्रीशैल रणखांबे, अरुणा भालेराव, विजयलक्ष्मी झाकणे, सुनीता बेरा, हिराबाई कांबळे, मोहसीन फुलारी, शिवाजी साळुंखे, शकुर शेख, अकबर शेख, मुदसर शेख, हाजी महेमुद शेख, करीम शेख आदी उपस्थित होते.