सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे रविवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. शहरात महेश कोठे यांच्या आयटी पार्क या महत्वकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ त्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर त्यांनी सांगोला येथे स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमास उपस्थित लावली.
या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची आवर्जून उपस्थिती होती. विजय दादा हे सध्या तब्येतीच्या अस्वस्थामुळे राजकारणामध्ये सार्वजनिक ठिकाणी नाहीत. शरद पवार यांनी बारामतीला जाताना अकलूज मार्गे जात मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्याला आवर्जून भेट दिली आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. जरी राजकारणात आपण एकमेकांच्या विरोधात असलो तरी पवार यांनी आपले जुने ऋणानुबंध जपत दादांची आवर्जून भेट घेतली. सध्या ते फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाले आहेत.