राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच पेटला असताना राजकीय नेत्यांमध्ये एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले आहे. यावर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मात्र सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे पहा त्या काय म्हणाल्यात,
राज्यातील मोठ्ठ्या ताई तुमची कावेबाज ‘माणुसकी’ प्रत्यक्षात हिडीस आणि ओंगळ आहे. रक्ताची चटक लागलेल्या राजकारणी तुम्ही आहात की काय अशी शंका तुमच्या चिथावणीखोर वक्तव्यांवरून येतेय..
ज्या पद्धतीनं परिस्थिती चिघळवणारी वक्तव्यं करताय त्यावरून तुमच्या खोटारड्या ‘माणुसकी’चा बुरखा टराटरा फाटलाय. कावीळ झालेल्यांना जसं सगळं पिवळं दिसतं, तशी तुमची स्थिती झालीय..
आणि हो, मोट्ठ्या ताई ! आपल्या भावाचा राग तुम्ही देवेंद्रजी यांच्यावर काढण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही. तुमचा चिडचिडेपणा का वाढला, याचे कारण राज्यातील जनतेला पुरते ठावूक आहे. सत्तेतल्या आमदारांची तुम्ही चिंता करू नका. त्यांचा सरकारवर ठाम विश्वास आहे पण तुमच्याच पक्षातील आमदारांचा तुमच्यावर किती भरवसा आहे हे तुम्हाला कळालंच असेल…
पक्ष टिकवण्यासाठी कधी सुप्रीम कोर्टात, कधी निवडणूक आयोगात जाऊन ड्रामा करण्याची वेळ तुमच्यावर आलीय. ‘अर्श से फर्श’ वर आलात यापेक्षा अधोगती आणखी काय असू शकते…