सोलापूर-माळशिरस येथील नाना आसबेचा गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणातील साक्षीदारावर प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या साजिद इब्राहीम सय्यद रा.अकलूज याचा जामीन अर्ज माळशिरस येथील मे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश कारंडे यांनी फेटाळला.
यात हकिकत अशी की, सन २०१६ मध्ये देवकर खून खटल्यातील नेत्र साक्षीदार नाना आसबे याचा प्रदिप माने,देवा जाधव,रमेश धुळे,दशरथ विठोबा माने, अतुल गोरख इंगळे,राजु मधुकर भोसले,साजिद इब्राहिम सय्यद, सचिन दामोदर एकतपुरे, सागर प्रताप मोहिते या लोकांनी कट रचून खुन केल्याने त्यांचे विरुद्ध खुनाच्या व मोक्काच्या आरोपाखालील खटला माळशिरस सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.त्या खटल्यामध्ये गणेश सदाशिव भोसले हा महत्वाचा साक्षिदार आहे. सदर केसची नियमित सुनावणी सुरू होणार आहे असे असताना रोहित राजु भोसले व सचिन दामोदर एकतपुरे हे लोक नाना आसबे खुन केसमधील साक्षिदार आहेस तू त्यास जास्त क्राँस करू नको, वकील देवु नको असे म्हणुन दबाव टाकत होते. तसेच रोहित राजू भोसले हा माझे वडीलांचा जामिन होवु दे असे दबाव टाकत होता.
दि.24/08/2023 रोजी फिर्यादी गणेश भोसले,किशोर उर्फ पिटु आसबे, सुनिल इंगळे,आत्माराम पवार, शंकर भिताडे व इतर दोन ते तीन लोक माळशिरस कोर्टात तारीख असल्याने गेले होते. सदर ठिकाणी केसमधील आरोपीचे बाजुचे अतुल इंगळे, नागेश उर्फ गोपी इंगळे, दामोदर एकतपुरे, निखील दामोदर एकतपुरे, सागर प्रताप मोहिते, देवा जाधव याचा भाऊ असे लोक आले होते. कोर्टामध्ये सदर केस ही पुढील महिण्याचे 1 तारखेपासून सुरू होणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे केस सुरू होणार असल्याने वरील लोक नाराज झाले होते व रागाने पहात होते. फिर्यादी हा कोर्टाचे काम संपवुन दुपारी अकलुज येथे घरी आला. त्यानंतर रात्री 8.30 वा. चे सुमारास जेवण करून पान खाण्यासाठी अशोक चौक येथे आला व पान खावुन आयसीआयसीआय बँकेसमोर जाऊन थाबला व त्यानंतर फिर्यादी हा मोटार सायकलवरून घराकडे निघाला असता त्यावेळी संग्रामनगर ओलांडुन रात्री 9.30. वा. सुमारास पुढे आला असता पाठीमागुन एक मोटारसायकलवर 03 इसम आले व त्यांनी थांबविले त्यावेळी रस्त्यावरील लाईटचे व मोटारसायकलचे लाईटचे उजेडात पाहिले असता, त्यांचेपैकी एक रोहित राजु भोसले असल्याचे पाहिले व इतर दोन अनोळखी होते, त्यांचे हातात लोखंडी कोयते होते. त्यापैकी रोहित भोसले याने तु नाना आसबे खुन केसमध्ये लय मस्ती करतोय, कोर्टात जातोय, माझे वडीलांना जामिन होवु देत नाही, तुला आता जिवंत सोडत नाही असे म्हणुन त्या तिघांनी त्याचे हातातील कोयत्याने डोकीत, दोन्ही हातावर, तोंडावर, डावे पायावर सपासप वार केले त्यामुळे रक्तबंबाळ होवुन मोटार सायकल सोडुन काही अंतर जावुन खाली पडला. त्यावेळी खाली पडल्यावरही तिघांनी दोन्ही हातावर, डोकीत कोयत्याने मारहाण केली. त्यामुळे फिर्यादीचे हाताचे तीन तुकडे झाले व नाक कापून निघाले व डोक्यात व शरीरावर अनेक गंभीर जखमा झाल्या.त्यानंतर फिर्यादीने मोठमोठ्याने आरडा ओरडा केल्यावर मित्र विक्रम कांबळे, आत्माराम पवार हे लोक पळत येत असल्याचे पाहुन रोहित भोसले व त्याचे सोबतचे दोन अनोळखी इसम हे तेथुन त्यांचे मोटार सायकलवरून तेथुन निघुन गेले तरी जिवे ठार मारण्याची सुपारी देणारे 1) प्रविण उर्फ पपु भोसले, 2) अतुल उर्फ पिंटु मोहिते, 3) साजिद इब्राहीम सयद4) आदित्य मोहिते, 5) नितीन एकतपुर, 6) अतुल उर्फ भैया इंगळे 7) नागेश उर्फ गोपी इंगळे सर्व रा. अकलुज ता. माळशिरस प्रत्यक्ष जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे 8) रोहित राजु भोसले रा. अकलुज ता. माळशिरस व 9) अनोळखी दोन इसम यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अशा आशयाची फिर्याद गणेश सदाशिव भोसले याने अकलूज पोलीस स्टेशन येथे दाखल केली.
यात अटकेतील आरोपी साजीद सय्यद याने माळशिरस येथील सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
यात मूळ फिर्यादी तर्फे व सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना खून व मोक्क्याच्या गंभीर खटल्यातील मुख्य साक्षीदारास त्याचा पुरावा कोर्टासमोर येण्यास रोखण्यासाठी त्याचेवर प्राणघातक हल्ला झालेला असल्याने आरोपी जामिनास पात्र नाही असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
यात मुळफिर्यादीतफे अँड. संतोष न्हावकर अँड धर्यशील भोसले यांनी सरकार पक्षातर्फे अँड. संग्राम पाटील यांनी तर आरोपीतफे अँड. शारपू शेख यांनी काम पाहिले.