सोलापूर : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे पाच दिवस रजेवर असल्याने त्यांचा अतिरिक्त कार्यभार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदासोबतच आता मनीषा आव्हाळे यांना जिल्हाधिकारी पदाचाही कारभार सांभाळावा लागणार आहे.
मनीषा आव्हाळे या लकी ठरले आहेत. 21 जुलै रोजी त्यांचे प्रमोशन होऊन त्यांची नियुक्ती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर झाली. आज बरोबर एक महिन्यानंतर लगेच त्यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार आला आहे.
अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्याने ते दहा दिवस रजेवर आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी नसल्याने जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार आयएएस सीईओ आव्हाळे यांच्याकडे देण्यात आला आहे. सोमवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक यांनी जिल्हा परिषदेमध्ये येऊन आवळे यांना कार्यभार स्वीकारण्याचे पत्र दिले.