मराठा आरक्षणासाठी बेमुदत आमरण उपोषण करणाऱ्या अंतरवली सराटी येथील मराठा बांधवांवर पोलिसांनी अमानुष लाठी चार्ज केला होता हे प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय ठरले. मराठा समाजात असंतोषाचे वातावरण होते. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लाठीचार्जचा आदेश दिल्याचा आरोप झाला होता.
दरम्यान आता माहिती अधिकारातून माहिती समोर आली आहे. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदेश नाहीत. माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी आरटीआय अर्ज केला होता. त्यावर जालन्याचे पोलीस उपअधिक्षक आर सी शेख यांनी माहिती दिली आहे.