सोलापूर : हद्दवाढ भागातील गुंठेवारीचा विषय संपून आता भोगवटदारांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्याची प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आपल्या भागातील विविध नागरी समस्या आणि प्रॉपर्टी कार्ड साठी शासन पातळीवर प्रयत्न करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या सत्कार कार्यक्रमाचा आयोजन कुमठा नाका परिसरातील सोलगी नगर वासियांनी रविवारी केले होते. या कार्यक्रमास माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे माजी नगरसेविका परविन इनामदार, बुऱ्हाण मुल्ला, काँग्रेसच्या कार्यकर्त्या कदम यांची उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना बाबा मिस्त्री म्हणाले, सोलगी नगरातील ड्रेनेजलाईनचे काम आठ दिवसात सुरू होईल, कमी प्रेशरच्या पाण्याचा प्रश्न ही लवकर सुटेल असे सांगतानाच प्रॉपर्टी कार्डवर त्यांनी भाष्य केले. हद्दवाढ भागातील अनेक वर्षांपासूनचा गुंठेवारीचा प्रश्न आहे, त्यामुळे कुणाला लोन मिळत नाही, खरेदी खत होत नाही, सातबारा उतारा नाही, मात्र आता या सर्व अडचणींवर मार्ग निघाला असून महापालिकेत नाव नोंदी असलेल्या प्रत्येक मिळकतदारांना स्वतःच्या नावाने प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. ते काम सुरू झाले असून एक ते दीड वर्षात प्रत्येकाच्या हातात कार्ड पडेल असे सांगत त्यांनी या कामात सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मोठे सहकार्य लाभल्याची माहिती दिली.
नगरसेवक निकाळजे म्हणाले, सोलगी नगर वासियांची एकी आदर्शवत आहे, तुमच्या प्रत्येक समस्या प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
यावेळी नागेश सुपे, संतोष दिवाण यांनी प्रारंभी आपल्या समस्या आणि प्रश्नांवर उपस्थितांचे लक्ष वेधले.