सोलापूर : वीरशैव लिंगायत समाजातील सामाजिक कार्यकर्ते व सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मल्लीनाथ विश्वनाथ टिमके यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले आहे, त्यांची अंतयात्रा आज शनिवारी सकाळी ११ वाजता शिवछत्रपती रंगभवन चौक जवळील त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.
सोलापूर जिल्हा परिषद मध्ये पीपल्स हॉटेल त्यांच्या मालकीचे आहे, अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे ते होते, या पीपल्स हॉटेलच्या अनेक राजकीय नेत्यांच्या आठवणी आहेत, काही दिवसांपूर्वी माजी मंत्री दिलीप सोपल यांनी त्यांची हॉटेल मध्ये जाऊन भेट घेतली होती. काँग्रेस पक्षाचे ते कार्यकर्ते होते. मागील काही दिवसापासून ते आजारी होते.