सोलापूर : शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ सोलापूर शाखेच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजकुमार बामणगे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन गावडे, विभागीय अध्यक्ष बामेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
सोलापूर जिल्हयातील बऱ्याच शाळांना २० टक्के टप्पा अनुदान प्राप्त होऊन ही 8 महिने होऊन गेले आहेत.. तरी सुद्धा बऱ्याच शाळांना अनुदान आदेश मिळालेले नाहीत काही शाळांना अनुदान आदेश असून देखील त्यांना शालार्थ आयडी मिळालेले नाही, तरी लवकरात लवकर आदेश व शालार्थ आयडी प्रस्ताव तपासुन फाईल उप- संचालक कार्यालय पुणे, येथे सादर कराव्यात.
तसेच जिल्हा परिषदेमध्ये माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्याच्या संगीत खुर्चीचा खेळ चालू आहे. त्यामुळे अनेक विषय प्रलंबित असून जर मारुती फडके हे काम करण्यास इच्छुक नसतील तर सीईओ मॅडम यांनी दुसऱ्या अधिकाऱ्याला पदभार देऊन शिक्षकांच्या प्रलंबित फायलींचा निपटारा करावा अशी मागणी करण्यात आली आहे.