सोलापूर : राज्य शासनाने 29 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद या सणाबाबत सरकारी सुट्टी जाहीर केली होती त्यामुळे सोलापुरात गुरुवार 28 सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी राहणार नाही अशी माहिती सायंकाळी सात वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून मिळाली. परंतु सोलापुरातील अनंत चतुर्दशी रोजीचे विसर्जन मिरवणूक पाहता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गुरुवार 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी निमित्त शासकीय सुट्टी जाहीर केली आहे त्यामुळे आता शासकीय अधिकाऱ्यांना सलग पाच दिवस सुट्टी मिळणार आहे.
राज्यातील पोलीस पाटलांचे प्रश्न, सोमनाथ वैद्य यांनी मांडले गृहमंत्र्यांसमोर ; या केल्या महत्वाच्या मागण्या
राज्यातील पोलीस पाटलांचे प्रश्न, सोमनाथ वैद्य यांनी मांडले गृहमंत्र्यांसमोर ; या केल्या महत्वाच्या मागण्या सोलापूर : पोलीस पाटलांचे मानधन व...