सोलापूर – घराघरात दिवाळीचा उत्सव साजरा होत असताना समाजातील अनेक घटक असे आहेत की त्यांना दसरा काय आणि दिवाळी काय? एकसारखीच, हातात पैसा नसताना करणार तरी काय?, रोज मोलमजुरी करून आपल्या आणि लेकरांच्या पोटाची खळगी भरणाऱ्या गरजवंतांच्या चेहऱ्यावर या सणाचा गोडवा पाहायला मिळावा असे अनेकांना वाटते. परंतु कृतीतून तिथपर्यंत पोहोचून, त्यांना काहीसा का होईना आनंद मिळावा यासाठी एम के फाऊंडेशन च्या वतीने दिवाळीचे संपूर्ण किट देवून दिवाळी भेट दिली. याचा शुभारंभ एम आय ङी सी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
एम के फाऊंडेशन च्या वतीने दिवाळीच्या किराणा सामानाचा किट भेट स्वरूपात देण्यात आल्या. अनपेक्षितपणे मिळालेल्या या भेटीमुळे त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला. दिवाळीची ही भेट अनेक कुटुंबियांना सुखावून जाणारी आहे.
समाजातील सुमारे १००० कुटूबांना दिवाळीचे किट वाटप एम के फाऊंडेशन चे महादेव कोगनुरेंच्या हस्ते करण्यात येणार आहे ह्याचा शुभारंभ नीलम नगर भागातील कामगार वसाहतीतून आज करण्यात आला.
यावेळी महादेव कोगनुरे म्हणाले, दिवाळीनिमित्त घरोघरी फराळाची मेजवानी असते, अशा वेळी आपल्या समाजातील एक वर्ग या आनंदापासून दूर आहे, हे सत्य किती भीषण अस्वस्थ करणारे आहे! याची जाणीव मला असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब, वंचित लोकांना अव्याहतपणे मदत करणे यापेक्षा मला मोठी दिवाळी नाही.
याप्रसंगी एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षका सौ अश्विनी भोसले मॅडम, मल्लिनाथ धुळखेडे, शरनु मुलगे, मनोहर माचर्ला, यामुनाथ मिस्किन, लक्ष्मण संभारंब, गणेश संभारंब, सागर दासरी, नितीन सकनियाल, श्रीनिवास बलभद्र, इरान्ना माचर्ला, देविदास यलदी, चिंतलय्या तातिकोंडा, सागर पाटील, राजू मागणुर, नागनाथ मादगुंडी, केशव गांती, व्यंकटेश अरगे, प्रभाकर मादगुंडी, तसेच एम के फाउंडेशन चे संचालक सदस्य यांच्यासह भागातील महिला मोठ्यप्रमाणात उपस्थित होत्या.