महाराष्ट्रात सध्या आरक्षणासाठी मराठा समाज व धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत आहे. त्यात आता लिंगायत समाजानेही सरसकट आरक्षणाची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. लिंगायत महासंघाचे सहसचिव सुरेश वाले हे वटवटे तालुका मोहोळ येथून पायी पदयात्रा करत सोलापूर शहरातील बसवेश्वर सर्कल पदयात्रेचा समारोप करुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत.
मंगळवेढा येथील प्रस्तावित महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या कामास सुरुवात करावी, लिंगायत समाजातील मुला मुलींसाठी वसतिगृह तसेच वडापुर बॅरेजसाठी तात्काळ निधी उपलब्ध करावा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. लिंगायत समाजातील सर्व संघटना संस्थानी आपल्यापरीने या मागण्या पूर्ण करण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन वाले यांनी केले.