सोलापूर दि. २:- मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गात घोषित केल्यामुळे आणि त्याअनुषंगाने उद्भवलेल्या असाधारण आणि अपवादात्मक परिस्थितीमुळे भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून राज्य शासन या प्रश्नी आवश्यक तो निर्णय घेऊ शकेल. मात्र अद्यापही याबाबत कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. म्हणून आक्रमक होऊन मराठा समाजाला आरक्षणासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात उतरावे लागले. सबंध महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. हि प्रमुख मागणी घेऊन बेमुदत साखळी उपोषण आणि आमरण उपोषण चालू आहे. याला सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) चा जाहीर पाठींबा असून आम्ही या आंदोलनात सक्रियपणे उतरण्याची ग्वाही देत आहे. अशा शब्दात पाठींबा देऊन सरकारच्या आडमुठीधोरणांवर परखड टीका केली.
रे नगर ला देण्यात आलेली नोटीस रद्द करून लाभार्थ्यांना मीटरसह नवीन जोडणी नाममात्र ५०० रुपये दराने द्यावे, विद्युत स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करावी, १ ऑक्टोबर पासून वाढीव वीज दर रद्द करावे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाचे खाजगीकरण रद्द करावे, कॉ. गोदुताई परुळेकर वसाहतीतील अंतर्गत नवीन रस्ते वा रस्त्यांचे पुर्नडांबरीकरण करण्यात यावे. या मागण्या मान्य नाही झाल्यास दिवाळीनंतर मुंबईच्या आझाद मैदानावर ३० हजार श्रमिक कष्टकऱ्यांना घेऊन निर्णयाक आरपारची लढाई करण्याचा वज्र निर्धार पूनम गेट येथे झालेल्या जाहीर सभेत कॉ. आडम मास्तर यांनी केला.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स च्यावतीने गुरुवार २ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद पूनम गेट येथे विविध न्याय हक्काच्या मागण्या घेऊन ज्येष्ठ नेते कॉ. नरसय्या आडम (मास्तर), सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चाद्वारे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना शिष्टमंडळाद्वारे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात सिटू च्या राज्य उपाध्यक्षा कॉ. नलिनीताई कलबुर्गी, कॉ. युसुफ शेख (मेजर), कॉ. सुनंदाताई बल्ला, शकुंतला पाणीभाते, ॲड. अनिल वासम, विक्रम कलबुर्गी, वीरेंद्र पद्मा, राजू काकी, आरिफ मणियार आदी उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर नसीमा शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी, शेवंताताई देशमुख, म.हनीफ सातखेड, मुरलीधर सुंचू आदी उपस्थित होते.
सदर धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी दाऊद शेख, नरेश दुगाणे, जावेद सगरी, हुसेन शेख, राजेश काशीद, नितीन कोळेकर, बजरंग गायकवाड, जुबेर सगरी,अस्लम शेख, नितीन गुंजे, प्रशांत चौगुले, युसुफ कालु, सिद्राम गायकवाड, धनराज गायकवाड, अमीन शेख, हरीश पवार सलमान शेख, अरबाज सगरी,फिरोज शेख,सनी शेट्टी,
विल्यम ससाणे,वसीम मुल्ला,बापू साबळेअप्पाशा चांगले, रफिक काजी, हसन शेख,वसीम देशमुख,व सर्व गोदूताई परुळेकर सर्व कार्यकर्ते , शाम आडम, राजू काकी,श्रीनिवास बंडा, पांडुरंग काकी, अंबादास कुने, अशोक बल्ला,बाळकृष्ण मल्याळ,विजय हरसुरे, दीपक निकंबे,अंबादास बिंगी, प्रकाश कुऱ्हाडकर,राजू गेंट्याल,सनी कोंडा, किशोर गुंडला, संजय ओंकार, युसुफ शेख,बालाजी तुंम्मा,विजय मरेड्डी, इलियास सिद्दीकी,अकिल शेख, असिफ पठाण, सुनीता अंजिकाने,सलीम शेतसंदी, सुरेखा गडदे, प्रभाकर कलशेट्टी, किशोर मेहता,बाबू कोकणे,शहाबुद्दीन शेख, बुवा माळी ,प्रजा नाट्य मंडळ कलापथकचे प्रशांत म्याकल, चंद्रकांत मंजुळकर, रघुनाथ सामल, विशाल पवार, अंबादास रच्चा, चंद्रकांत लिंबोळे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ॲड अनिल वासम यांनी केले.