राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.24 ऑगस्ट,2023 रोजी मुंबईच्या पक्षाच्या संपर्क कार्यालयात अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी अल्पसंख्याक समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यावर अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांनी प्रकाश टाकला. या प्रलंबित विषयांमध्ये लक्ष घालून त्या पूर्ण करण्याच्या प्रयत्न निश्चितपणे होईल असे आश्वासन अजित दादांनी सर्व उपस्थितांना दिले होते.
21 सप्टेंबर 2023 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अध्यक्षतेखाली मुंबई येथे मंत्रालयातील त्यांच्या दालनात मुस्लिम आरक्षणासाठी बैठक झाली. राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्या, प्रलंबित विषय यांचे निवारण करण्यासाठी व योजनांची काटेकोरपणे अमलबजावणी करून या समाजाचे सबलीकरण करण्याबाबतची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार शेख, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वकफ बोर्डचे चेअरमन आ.वजाहत मिर्झा, तसेच मौलाना मुफ्ती रोशन, मौलाना नदीम सिद्दिकी, अल्पसंख्यांक विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती कुंदन, उपसचिव व वक्फ बोर्ड चे सीईओ मोईन तशिलदार, व विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.
बैठकीत राज्यातील अल्पसंख्यांक समाज व महाराष्ट्र राज्य वकफ बोर्डाच्या समस्या बाबत महत्त्वाची चर्चा करून निर्णय घेण्यात आले. सदर बैठक आयोजित केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचे सर्व अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकाऱ्यांचे वतीने आभार व्यक्त केले.