जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी सत्काराने भारावले ! कर्मचाऱ्यांनी का केला सन्मान
सोलापूर जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक दोन चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांचा बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंगी सत्कार केला. हा सत्कार आणि कर्मचाऱ्यांचे प्रेम पाहून कुलकर्णी भारावून गेले.
सोलापुरातील दिव्य मराठी दैनिकाच्या वतीने संतोष कुलकर्णी यांना श्री परशुराम पुरस्कार जाहीर झाला आहे. सोलापुरातील मोजक्यांनाच हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्यामध्ये बांधकाम कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांचे नाव आहे. आपल्या साहेबांना एवढा मोठा पुरस्कार मिळाल्याचे समजताच सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन त्यांना मानाचा फेटा बांधून त्यांचा सत्कार केला.