सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे प्रथमच सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. दुपारी दोन वाजता हेरिटेज मंगल कार्यालय या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विखे पाटील यांनी स्टेजवरील सर्वच आमदारांची नावे घेतली मागच्या रांगेमध्ये माजी आमदार सिद्रामआप्पा पाटील हे बसले होते.
याच वेळी नाव घेताना त्यांनी सिद्रामप्पा ऐवजी काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे नाव तोंडातून आले त्याचवेळी सर्व उपस्थित आमदारांनी मैत्री नाही सिद्रामप्पा पाटील असे सांगितले. तेव्हा त्यांनी नावात बदल केला यावरून उपस्थित माध्यम प्रतिनिधी मध्ये विखे पाटील यांनी हे अजून काँग्रेसला विसरले नाहीत अशी चर्चा सुरू होती. दरम्यान काय म्हणाले विखे पाटील पहा हा व्हिडिओ



















