सोलापूर : युवक कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार, रासेयो उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे ते पंढरपूर स्वच्छ वारी – स्वस्थ वारी निर्मल वारी – हरित वारी – लोकशाही वारी या दिंडीचे आयोजन दिनांक २२ जून ते १० जुलै, २०२२ या दरम्यान करण्यात आले आहे.
या दिंडीत महाराष्ट्रातील ८ विद्यापीठातील १७० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या दिंडींचे हे १८ वे वर्ष असून या माध्यमातून आजवर विविध विषयांवर प्रबोधन आणि सर्वेक्षण करण्याचे काम विद्यार्थी स्वयंसेवक करीत आहेत. या दिंडीसोबत डॉ. विलास कर्डिले, डॉ. राजकुमार रिकामे, डॉ. परमेश्वर पुरी, शलिनी पेखले, वैशाली घुले हे प्राध्यापक कार्यक्रम अधिकारी म्हणून सहभागी झाले आहेत. कारूंडे या विसावा ठिकाणी या विद्यार्थ्यांनी दारू व व्यसनमुक्तीवर प्रबोधन केले पहा हा संपूर्ण व्हिडिओ…..
















