सोलापुरात वंचितने श्रीशैल गायकवाड यांना डावलले ! राहुल गायकवाड सोलापूरचे उमेदवार तर माढयाचा उमेदवार ही ठरला
सोलापूर : वंचित बहुजन आघाडीने आणखी 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी राहुल गायकवाड यांना तर माढा मतदारसंघा संघात रमेश बारसकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर हे सोलापुरातून उमेदवारी देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आजपर्यंत सोलापुरात भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि काँग्रेसच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू होती सुरू आहे. वंचित चा उमेदवार कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सोलापुरातून पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड हे इच्छुक होते परंतु पक्षाने त्यांना डावलल्याचे दिसून आले. अखेर सोलापूर व माढा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी एन्ट्री केली आहे. यामुळे आता या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस भाजपा आणि वंचित अशी प्रमुख तिरंगी लढत होणार असल्याचे प्राथमिक चित्र आहे.
माढा मतदारसंघातून वंचित कडून मोहोळचे माजी नगराध्यक्ष व ओबीसी नेते रमेश बारसकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व धाराशिव जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून यापूर्वी काम पाहत होते. काही दिवसापूर्वी त्यांनी तेथील पदाचा राजीनामा दिला. दरम्यान वंचित बहुजन आघाडीने त्यांना माढा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ते माळी लिंगायत समाजातून येतात. सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातून अक्कलकोट तालुक्यातील बादोले गावातील राहुल गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. ते बौद्ध समाजाचे आहेत.
सन 2019 मध्ये झालेल्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वेसर्वा एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना तिसऱ्या क्रमांकाची एक लाख 70 हजार सात मते मिळाली होती. भाजपाचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा एक लाख 58 हजार मतांनी पराभव केला होता. तर माढा मतदार संघात मागील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयराव मोरे यांना 51 हजार 532 मते मिळाली होती.
● कोण आहेत राहुल गायकवाड ?
– राहुल काशिनाथ गायकवाड
– मूळ गाव बादोले,
अक्कलकोट तालुका
जिल्हा सोलापूर .
वय – 44
वडिलांचे नाव –
काशिनाथ पुंडलिक गायकवाड
(K.P. GAIKWAD)
एसपी, पोलिस अधिकारी होते.
IPS,
शैक्षणिक पात्रता –
1.सिम्बायोसिस कॉलेज ऑफ कॉमर्समधून वाणिज्य पदवी ,
2.पोस्ट ग्रॅज्युएट , एमबीए, पुणे विद्यापीठाकडून परकीय व्यापार.
सामाजिक उपक्रम –
2009 पासून सक्रिय
-अक्कलकोट ते आळंद/गुलबर्गा या कर्नाटकला जोडणाऱ्या महामार्गासाठी यशस्वी रास्ता रोको केले होते.