धर्मराज काडादी यांच्यासाठी या भाजप नेत्याने घेतला लीड ; प्रणिती शिंदेंना भेटले शिष्टमंडळ
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार लढवण्याची घोषणा करून श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांनी मोठा राजकीय बॉम्ब टाकला. यांच्यामुळे अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले गेले आहे. काडादी यांच्यासाठी सध्या भारतीय जनता पार्टीत असलेले पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते राजशेखर शिवदारे यांनी पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.
काडादी यांच्या गंगा निवासस्थानी झालेल्या बैठकीला राजशेखर शिवदारे, सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन पुष्कराज काडादी, तालुकाध्यक्ष हरीश पाटील, राधाकृष्ण पाटील, गुरुसिद्ध म्हेत्रे, महादेव चाकोते, सायबन्ना बिराजदार, शिवानंद पाटील कुडल, वसंत पाटील भंडारकवठे, अख्तरताज पाटील, राम वाकसे, सिध्दाराम चाकोते, विजयकुमार बिराजदार, सिध्दाराम व्हनमाने, महादेव पाटील भंडारकवठे, प्रा. अशोक निम्बर्गी, सतीश पाटील वडकबाळकर, सुर्यंकात पाटील, विद्याधर मुलगे, नारोने सर, शरणराज काडादी, बाळासाहेब बिराजदार, लोकप्पा माशाळे, विठ्ठल पाटील, रावसाहेब व्हनमाने यासह अनेक नेते उपस्थित होते.
या बैठकीनंतर शिवदारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शिष्टमंडळ टाकळी येथील सुशीलकुमार शिंदे यांच्या जाई जुई फार्महाउस वर जाऊन त्या ठिकाणी खासदार प्रणिती शिंदे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काडादी हे काँग्रेस कडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे माहिती देण्यात आली.
भविष्यात धर्मराज काडादी यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर काँग्रेस कडून इच्छुक असलेले माजी आमदार दिलीप माने, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे, 2019 चे उमेदवार बाबा मिस्त्री, एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनवरे उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील या प्रमुख नेत्यांची भूमिका काय राहील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.