सोलापूर : सोलापुरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह 14 पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा येथील जामगोंडे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला. यावेळी माहितीचा सर्वच पक्षाच्या नेत्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपले मतभेद विसरून ही एकी अशीच कायम राहावी अशी हाक यावेळी देण्यात आली.
सोलापूर येथे महायुतीतील सर्व पक्षातील कार्यकर्त्याचा जिल्हास्तरीय मेळावा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या मेळाव्यास राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सांवत, खासदार डॉ जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, खासदार रणजित नाईक निंबाळकर, ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे, ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख मेळाव्याचे समन्वयक तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, माजी खासदार अमर साबळे, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार राजेंद्र राऊत, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख मनीष काळजे, जिल्हाप्रमुख महेश साठे, जिल्हाप्रमुख चरण चौरे, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाजप नेते शहाजी पवार, विक्रम देशमुख, राष्ट्रवादीचे किसन जाधव, रणजीतसिंह शिंदे, रिपाई कवाडे गटाचे राजाभाऊ इंगळे, महेश चिवटे, भाजप जिल्हाध्यक्ष केदार, महिला आघाडीच्या रोहिणी तडवळकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सुवर्ण झाडे यांच्यासह भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते.
यावेळी भाषण करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, संतोष पवार, मनिष काळजे यांनी, देशात होत असलेला विकास पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद विसरून काम करावे, राज्यात महायुतीने 45 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. परंतु 45 पेक्षा लोकसभेच्या सर्व 48 जागा जिंकण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा. मी मोठा तो छोटा असे म्हणण्यापेक्षा आपला देश मोठा या भावनेने आगामी निवडणुकांसाठी काम करावे असे आवाहन केले.