भाजपला अक्कलकोट व शहर उत्तरच्या इतक्या लिडची जोरदार चर्चा ; सोलापुरात काँग्रेसला हेच टेन्शन
सोलापूर : मागील दोन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभेची 2024 ची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. 2014 आणि 2019 मधील लाट यावेळी पाहायला मिळाली नाही. त्यातच काँग्रेस पक्षाकडून तीन वेळा आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे या उमेदवार होत्या आणि भारतीय जनता पार्टी कडून माळशिरसचे आमदार राम सातपुते हे उमेदवार आहेत.
हे पण वाचा 👇👇👇👇
प्रणिती शिंदे 23 हजार मतांनी निवडून येणार
भाजपच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या सभा झाल्या तर दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सभा घेण्यात आल्या.
काँग्रेसच्या शहर मध्य या मतदारसंघात टक्केवारी का कमी झाली
एकूणच वातावरण पाहता काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे या वीस ते पंचवीस हजाराने निवडून येतील असे सर्वत्र बोलले जात आहे. मात्र भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या शहर उत्तर आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळेल अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शहर उत्तर या मतदारसंघातून किमान पन्नास हजार हून अधिक मताधिक्य मिळेल असे भाजपचा कार्यकर्त्यांकडून बोलले जात असून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून 25 हजाराहून अधिक मताधिक्य सातपुते यांना मिळण्याची चर्चा होत आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातून 75 हजार पेक्षा जादा मताधिक्य भाजपला मिळाल्यास काँग्रेसचे शीट अडचणीत येईल अशा चर्चेने आता उधाण आले आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये जनतेने यंदा मालकाचे कोणतेही ऐकले नसल्याचे बोलले जात असले तरी ‘मालक जिथे मतदान तिथे’ असे समीकरण पाहायला मिळते. परंतु या मतदारसंघातून भाजपला मताधिक्य मिळण्याची चर्चा होत आहे. एकूणच आज पर्यंतच्या लोकसभा निवडणुकीचे इतिहास पाहिला असता मोहोळ मधून काँग्रेसच्या शिंदे यांनाच मताधिक्य मिळाले आहे.
काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून अक्कलकोट तालुक्यात दहा हजार आणि शहर उत्तर मध्ये 25000 असे लीड अपेक्षित आहे मात्र शहर मध्य, दक्षिण विधानसभा मतदारसंघ, मोहोळ, पंढरपूर या चारही मतदारसंघात झालेले मतदान मुस्लिम समाज, मराठा समाज तसेच आंबेडकरी समाजाने काँग्रेसला केलेल्या मतदानामुळे प्रणिती शिंदे यांना चांगले मताधिक्य मिळेल आणि प्रणिती या 25000 लीडने विजयी होतील या आशेवर काँग्रेसचे कार्यकर्ते दिसून येतात मात्र या उलट भाजपच्या कार्यकर्त्यांमधून झालेले मतदान पाहता राम सातपुते किमान एक लाखाच्या फरकाने विजयी होतील अशी अपेक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे.