क्या बाब है ! सोलापूर जिल्हा परिषद राज्यात तिसरी ; दिलीप स्वामी यांनी केले अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन
सोलापूर – यशवंत पंचायराज अभियानात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात तृतीय क्रमांक मिळवित 17 लक्ष रूपयाचे पारितोषिक पटकाविले आहे. तर पंढरपूर पंचायत समितीने पुणे विभागात द्वितीय पुरस्कार पटकावित 8 लाख रूपयाचे पारितोषिक पटकाविले आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने आज शासन निर्णय काढून यशवंत पंचायत राज अभियानाच्या पुरस्काराची घोषणा केली आहे.
सन 2022-23 या कालावधीत झालेल्या पंचायतराज प्रशासनातील कामाचे मुल्यमापन करून या पुरस्काराची घोषणा करणेत आलेली आहे. या बद्दल ग्रामविकास मंत्री तथा पालक मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांनी सर्व अघिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
सन 2022-23 या कालावधीत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी विशेष लक्ष दिले होते. या कालावधीत सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभारी म्हणून इशाधिन शेळकंदे व विद्यमान उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी काम पाहिले आहे.
ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये “पंचायत राज” संस्थांचे योगदान मोठे आहे. राज्यामधील विकासाच्या प्रमुख योजना पंचायत राज संस्थांमार्फत राबविल्या जातात. पंचायत राज संस्थांना त्यांनी केलेल्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता अधिक वाढविणे व त्यांच्यामध्ये उत्कृष्ट कामांची स्पर्धा निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी राज्यात पंचायत राज संस्थांचे व्यवस्थापन व विकास कार्यात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींसाठी सन 2005-2006 या आर्थिक वर्षापासून विभागस्तर व राज्यस्तरावर “यशवंत पंचायत राज अभियान” ही पुरस्कार योजना सुरु करण्यात आलेली आहे.
सन 2023-24 या वर्षापासून पुरस्कार योजनेचे नाव “यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान” असे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पंचायत राज प्रशासन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्या यांनी सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये केलेल्या कामाचे मूल्यमापन विचारात घेऊन महसूली विभागस्तर व राज्यस्तर अशा दोन स्तरावर “यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान” ही अभिनव पुरस्कार योजना राबविण्यात आली. सदर अभियानांतर्गत राज्यातील अत्युत्कृष्ट तीन जिल्हा परिषदा व तीन पंचायत समित्या पुरस्कारासाठी राज्यस्तरावर निवड करण्यात येते. राज्य स्तरावर वर्धा जिल्हा परिषदेने ने प्रथम (पारितोषिक ररू. 30 लाख ) तर अमरावती जिल्हा परिषदेने द्वितीय (पारितोषिक ररू. 20 लक्ष बक्षीस ) तर सोलापूर जिल्हा परिषदेने तृतीय पुरस्कार (पारितोषिक ररू. 17 लाख रूपये ) पटाकाविला आहे. तसेच विभागस्तरावर तीन पंचायत समित्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. सदर पंचायत राज संस्थांची निवड करण्यासाठी तालुकास्तरावर, जिल्हास्तरावर, विभागस्तरावर आणि राज्यस्तरावर पारितोषिक निवड समितीची स्थापना करण्यात आलेली होती.
पुणे विभाग स्तरावर शिराळा जिल्हा सांगली पंचायत समितीने प्रथम तर पंढरपूर पंचायत समितीने द्वितीय क्रमांक पटाविला आहे.
सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
सोलापूर जिल्हा परिषदेच्या
सर्व विभागांनी खुप मेहनत घेऊन काम केले. राज्यात सोलापूर जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकाविला. पंढरपूर पंचायत समिती विभागात दिव्तीय क्रमांक पटाकविला आहे. सर्वानी योगदान दिलेमुळे हे यश प्राप्त झाले आहे. असे मत सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन सिईओ व छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले.