सोलापूर झेडपी सीईओ कुलदीप जंगम यांच्या पेटार्यातून काय येणार ; इतक्या कोटीचे बजेट
सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कुलदीप जंगम यांचे पहिलेच प्रशासकीय अंदाजपत्रक बुधवार 19 मार्च रोजी दुपारी सादर होणार आहे. जंगम यांच्या पेटाऱ्यातून उद्या काय निघणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राज आल्यानंतर पहिले बजेट संदीप कोहिनकर यांनी सादर केले, दुसरे बजेट मनीषा आव्हाळे यांनी मांडले तर आता तिसरे बजेट हे कुलदीप जंगम सादर करणार आहेत.
मागील वर्षी सुमारे 48 कोटींचे बजेट सादर झाले होते, यंदा मात्र त्यात घट झाली असून सुमारे 40 कोटींचे सेस फंडाचे अंदाजपत्रक सादर होणार असल्याची माहिती अर्थ विभागातून मिळाली. या बजेट साठी कुलदीप जंगम यांनी मेहनत घेतली असून प्रत्येक विभागात काही तरी नाविन्यपूर्ण देण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांनी केला असल्याचे सांगण्यात आले. या अंदाजपत्रकात त्यांनी जातीने लक्ष घातले आहे.
सेस फंडाचा सर्वाधिक निधी हा बांधकाम विभागाला असतो, त्यानंतर लघु पाटबंधारे, समाज कल्याण, कृषी, महीला व बालकल्याण, पशू संवर्धन, आरोग्य, शिक्षण या विभागांना सेस फंडातून निधीची तरतूद केली जाते. आता कोणत्या विभागाला किती निधी दिला जातो अन् कोणकोणत्या नवीन योजना समोर येणार याकडे लक्ष लागले आहे.