सोलापूर जिल्हा मजूर फेडरेशन संचालकपदी अभिराज शिंदे यांची निवड
सोलापूर जिल्हा मजूर फेडरेशन संचालक पदी अभिराज शिंदे यांची निवड झाली. हि निवड महाराष्ट्र राज्य मजुर संघाच्या वतीने सोलापूर जिल्हा मजूर संघावर राज्य फेडरेशन प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.
त्या निमित्त संस्थेचे चेअरमन शंकर चौगुले, व्हा.चेअरमन मुजीब शेख व संचालक मंडळाच्या वतीने सत्कार देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. अभिराज शिंदे हे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात.