गेल्या दहा वर्षापासून काम सुरू असलेल्या सोलापूर शहरातील उर्दू घराचे उद्घाटन लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्यांक विकासमंत्री अब्दुल सत्तार शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणेकामी पाठपुरावा करणार असल्याचे राष्ट्रवादी अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांनी सांगितले.
18 डिसेंबर आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे वतीने अल्पसंख्यांक समाजातील अनेक प्रलंबित प्रश्नांसंदर्भात निवेदन देण्यात आले. यात सोलापूर शहरातील उर्दू घर जे गेल्या दहा-अकरा वर्षांपासून काम सुरू असलेल्या व दोन वर्षांपूर्वी पूर्ण काम होऊन देखील उद्घाटन झाले नाही.
उर्दू भाषेला प्रोत्साहन देणे, उर्दू संस्कृती कार्यक्रम राबविणे, मुशायरा, गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस घेणे, विद्यार्थ्यांना अभ्यास करिता लायब्ररी लवकर सुरू झाली तर त्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना मदत मिळेल व अनेक शासकीय योजना उर्दू घराच्या माध्यमातून राबविण्यात मदत होईल.
याच उद्देशाने प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उर्दू भवनची पाहणी केली व उद्घाटन संदर्भामध्ये लवकरच वरील नेत्यांची भेट घेऊन सुरू होण्याकरिता पाठपुरावा करण्यात आहे.
यावेळी दक्षिण विधानसभा अध्यक्ष अमीर शेख मध्य विधानसभा अध्यक्ष तन्वीर गुलजार ज्येष्ठ नेते रियाज पिरजादे संजू मोरे,इरफान शेख, टेपू उस्मान सय्यद ,राजू बेळनवरू, मोनिका सरकार, अलमेराज आबदिरजे, मुव्हीज मुल्ला, झहीर शेख, नायब बेगमपल्ली, आदम नालवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.