दिरंगाई, अडवणूक, पैशाची मागणी होत असेल तर माझ्या या ई-मेल वर थेट तक्रार करा ; मनपा आयुक्त ओंबासे झाले ॲक्टिव्ह
सोलापूर महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे हे आयुक्त म्हणून जॉईन झाल्यानंतर एक महिन्याने आज सोमवारी पत्रकार परिषद घेतली. महापालिकेचे कामकाज नागरिकांसाठी सोईस्कर व्हावे, भ्रष्टाचार रोखण्यासाठी त्यांनी उपाययोजना करण्याचा त्यांनी ठोस निर्णय घेतला आहे.
पत्रकार परिषदेत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात, सोलापुर महानगरपालिका मध्ये विविध कार्यालये कार्यरत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नागरीकांचा ज्या कार्यालयाशी संपर्क येतो अश्या कोणत्याही कामासाठी शासकिय कर्मचारी, एजंट, खाजगी व्यक्ती यांचेकडुन पैशाची मागणी केल्यास / होत असल्यास फक्त हि बाब आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांचेकडे खालील नमुद वैयक्तीक ई-मेल आय डी वर माहिती देणेत यावी. तथापी प्रशासकीय इतर अन्य कामकाजाच्या अडी अडचणी बाबत महानगरपालिकेने वेगवेगळे ऑनलाईन ॲप कार्यान्वीत केलेले असून त्यामध्ये परिवर्तन ॲप, व आपले सरकार या ॲपवर आपल्या तक्रारी नोंदविण्यात यावेत.
प्रस्तुत ई-मेल आय डी चा वापर हा केवळ भ्रष्टाचारा संबंधित तक्रारीसाठी करणेचा असून सबब प्रस्तुत ई-मेल आय डी आयुक्त स्वतः हाताळणार असल्याने माहिती देणा-या व्यक्तीच्या नावाबाबत गुप्तता पाळली जाणार आहे. त्यामुळे नागरीकांनी भ्रष्टाचार निर्दशनास आल्यास तातडीने सदची बाब कळवावी. भ्रष्टाचारास आळा बसावा व प्रशासकिय कामकाज सुलभ आणि पारदर्शक व्हावे यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशिल असल्याचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी सांगितले.
भ्रष्टाचार निर्दशनास आल्यास थेट गंभीर प्रशासकिय तसेच फौजदारी स्वरुपाची कारवाई करणेचे संकेत आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.
ई-मेल आय डी commissioner.solapurmc@gmail.com