सोलापूर महापालिका आयुक्त पोलीस अधिकाऱ्यांसह विजापूर रोडवर ; अन्यथा कारवाई करेन
सोलापूर : सोलापूर शहरातील विजापूर नाका ते सैफुल सर्व्हिस रोडवर झालेले अतिक्रमण पाहण्यासाठी सोमवारी महापालिका आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांच्यासह पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी संयुक्तपणे चालत सर्वत्र पाहणी केली.
विजापूर नाका ते सैफुल सर्व्हिस रोड वरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत खोके, लाकडी खोके, खाद्या पदार्थ, चायनीज गाड्या, कच्चे बांधकाकात केलेले गोडवून, लोखंडी खोके इत्यादीचे अतिक्रमण झाले असून ते अतिक्रमण ज्याचे आहे त्यांनी स्वतःहुन कडून घ्यावे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिला.
उपायुक्त तैमूर मुलाणी, सहा.आयुक्त शशिकांत भोसले, नगररचना संचालक मनिष भीष्णूरकर, PWD हायवेचे सुतार, राजगुरू, नीलकंठ मठपती, अतिक्रमण विभागाचे हेमंत डोंगरे, सुफियान पठाण हे अधिकारी उपस्थित होते.