सोलापूरचे जिल्हाध्यक्ष पद मला द्या ! काँग्रेसच्या या नेत्यांनी घेतला पुढाकार
सोलापूर – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा काँग्रेस पक्ष निरीक्षक मोहन दादा जोशी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता काँग्रेस भवन येथे सोलापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी अथवा प्रदेश कार्यकारणीवर निवड व्हावे या मागणीचे पत्र विजयकुमार हत्तुरे यांनी दिले.
सोलापूर शहर व जिल्हयासह महाराष्ट्र राज्यात गेल्या २० वर्षापासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करीत आहे. काँग्रेस पक्षामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढीसाठी व बळकटीसाठी कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे राज्य महासचिव या पदावर केले आहे. महाराष्ट्रतील ८ जिल्ह्यांमध्ये राज्यव्यापी लिंगायत धर्म व समाजाच्या विविध मागण्या संदर्भात महामोर्चाचे यशस्वी नेतृत्व केले आहे.
याशिवाय कर्नाटक, तेलंगना, आंध्रप्रदेश इत्यादी ठिकाणी लिंगायत समजाच्या मागण्यासंदर्भात महामोर्चाचा नेतृत्व केले आहे.
याशिवाय, सध्या हत्तुरे हे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर कार्यरत असून महात्मा बसवेश्वर ब्लड बँके माध्यमातून व्यापक जनसंपर्क आहे. सोलापूर महानगरपालिकेत परिवहन सभापती म्हणून उत्कृष्ट काम बजावले आहे. सोलापूर जिल्हा मध्ये विविध सामाजिक राजकीय उपक्रम यशस्वीरित्या राबविले आहेत.
सामाजिक कार्यातील अनुभवाचा व राजकीय कार्याचा अनुभवाचा विचारात घेवून सोलापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी निवड व्हावे याकरिता भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव के. सी. वेणूगोपाळ, मुकुल वासनिक, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथिला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर, प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा निरीक्षक मोहन जोशी, खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे विजयकुमार हत्तुरे यांनी मागणीचे पत्र दिले आहे.