हे कसले मुस्लिम नेते ! आता तर सोलापुरात बाबा मिस्त्री यांनाही विरोध !
सोलापूर : सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांना उमेदवारी मिळत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता सोलापुरातील काँग्रेस पक्षातील मुस्लिम कार्यकर्त्यांनी बाबा मिस्त्री यांनाही विरोध दर्शवला आहे. शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे माजी महापौर आरिफ शेख, शकील मौलवी, माजी स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी, शौकत पठाण, कोमारोह सय्यद यांच्या शिष्टमंडळाने नरोटे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आणि बाबा मिस्त्री यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. शहर मध्य याच मतदारसंघातील स्थानिक मुस्लिम कार्यकर्त्याला काँग्रेसने उमेदवारी द्यावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.
यानंतर चेतन नरोटे माध्यमांशी बोलताना म्हणाले अद्याप कोणतीही यादी जाहीर झालेली नाही बाबा मिस्त्री यांची उमेदवारी अजूनही निश्चित नाही आणि मी सुद्धा स्वतः इच्छुक आहे त्यामुळे यांच्या भावना मी पक्षश्रेष्ठींकडे पोहोचवणार आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी शौकत पठाण यांच्या इम्पेरियल गार्डनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत तसेच ताज कंपाउंड या ठिकाणी झालेल्या मेळाव्यामध्ये सुद्धा या सर्व मुस्लिम नेत्यांनी बाबा मिस्त्री हे जर उमेदवार असतील तर आपला विरोध राहणार नाही असे जाहीरपणे सांगितले होते परंतु आता तर हे बाबा मिस्त्री यांनाही विरोध करत आहेत. त्यामुळे यांच्या मागील बोलवता धनी कोण? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. आता या मतदारसंघातील मुस्लिम समाजाने नेमका काय बोध घ्यावा हा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे.