सोलापूर : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते. सायंकाळी त्यांचे शहरात आगमन झाले. रात्री साडे सातच्या सुमारास माजी मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या होटगी रोड वरील निवासस्थानी त्यांची भेट व स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन होते.
चंद्रकांत दादा वेळेवर पोहोचले. त्याठिकाणी आमदार सुभाष देशमुख यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. आमदार सचिन कल्याणशेट्टी, युवा नेते मनीष देशमुख, रोहन देशमुख, श्रीनिवास करली उपस्थित होते. बापू यांच्या कुटुंबियांसोबत नामदार दादांनी आपल्या पत्नी सोबत स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.




















