सोलापूर-सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात एका विधवा महिलेने बलात्काराची फिर्याद दिली आहे.या फिर्यादीमध्ये सदर विधवा महिलेने राष्ट्रवादीचे नेते व माजी महापौर मनोहर सपाटे यांवर गंभीर आरोप केले आहे.मनोहर सपाटे हे 1993 साली सोलापूरचे महापौर होते,त्यावेळी ते एका संस्थेचे अध्यक्ष होते.संस्थेत काम करणाऱ्या विधवा महिलेवर मनोहर सपाटेची वाईट नजर पडली.या संस्थेत काम करायचे असल्यास माझे ऐकावे लागेल अन्यथा नोकरीवरून काढण्याची धमकी दिली.मी सोलापूरचा महापौर आहे,अशा वेगवेगळ्या धमक्या देत विधवा महिलेवर 15 ऑगस्ट 1993 पासून 28 जून 2022 पर्यंत नैसर्गिक व अनैसर्गिक बलात्कार केला असल्याच भा.द.वि.376,377,384,504 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.
सोलापुरातील एका खाजगी संस्थेत सोलापूरचे प्रथम नागरिक व महापौर या नात्याने मनोहर सपाटे यांना बोलावण्यात आले होते.त्या खाजगी संस्थेत नोकरीला असणाऱ्या विधवा महिलेवर मनोहर सपाटेची वाईट नजर पडली.कार्यक्रमानंतर तत्कालीन महापौर सपाटे याने विधवा महिलेस कार्यालयात तू जवानीमध्ये विधवा झाली,तू माझे ऐकत जा,तू मला खूप आवडतेस,माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव अन्यथा तुला नोकरी वरून काढून टाकतो अशी धमकी देत ,15 ऑगस्ट 1993 साली पहिल्यांदा बलात्कार केला.त्यानंतर अनेकवेळा वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन त्या विधवा महिलेवर नैसर्गिक व अनैसर्गिक बलात्कार/अत्याचार केला अशी फिर्याद सदर महिलेने सोलापूर शहर येथील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली आहे.
पीडित विधवा महिला 1993 पासून तत्कालीन माजी महापौर मनोहर सपाटेचा हा शारीरिक अत्याचार सहन करत होती.पीडित विधवा महिला निवृत्त होण्याअगोदर एक वर्षा अगोदर तिला नोकरीचा राजीनामा द्यायला भाग पाडले.निवृत्तीमधून मिळणाऱ्या रकमेमधून 10 लाख रुपयांची खंडणी मागितली,अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिली.नाईलाजाने सदर पीडित महिलेने 10 लाख रुपये मनोहर सपाटेला दिलं आणि आपली सुटका करून घेतली.पण हा नराधम एवढ्यावर शांत राहिला नाही.पीडित विधवा महिलेला तिच्या वयाच्या 59 व्या वर्षी देखील त्यावर नैसर्गिक व अनैसर्गिक बलात्कार करत होता.
पीडित विधवा महिलेने फिर्याद देताना असेही पोलिसांना माहिती दिली की,माझे वय 28 जून 2022 रोजी वय वर्ष 59 असतांना ,मंदिरात पुजे साठी गेले होते.त्यावेळी संशयीत मनोहर सपाटे हा मंदिरात आला व जीवे मारण्याची धमकी देत,मंदिराच्या आवारात असलेल्या पत्रा शेडमध्ये घेऊन जाऊन पिस्तुलाचा धाक दाखवत पिस्तुल डोक्यावर लावली जीवे मारण्याची धमकी दिली आणि अत्याचार केला.1993 पासून पीडित विधवा महिलेवर मनोहर सपाटे हा शारीरिक ,मानसिक त्रास देत अत्याचार केला आहे.याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक देशमुख करत आहेत.



















