सोलापूर : जिल्हा परिषदेमध्ये स्वच्छता व साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सणाचा गोडवा अर्थ विभागाने चांगलाच वाढवला. दिवाळी सणाच्या फराळ साहित्याचे किट देण्यासह प्रत्येकी एक साडी सुद्धा भेट देण्यात आली.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार यांनी सामाजिक बांधिलकी जपताना जिल्हा परिषदेमध्ये साफसफाई व स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना आपल्या केबिनमध्ये बोलावून वित्त विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते दिवाळी फराळ साहित्याचे किट व साडी देऊन सन्मान केला. यावेळी या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. यावेळी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, कैलास कुंभार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



















